सोनुर्ली शाळेत मिळाले तब्बल ११ नवरत्न
विद्यार्थ्यांचे होत आहे सर्वत्र कौतुक
कोरपना :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथे केंद्रातील अठरा रत्न शोधण्यासाठी नवरत्न स्पर्धेचे आयोजन कल्याण जोगदंड शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, योगेश मोहितकर यांच्या अध्यक्षतेत, विलास देवाळकर केंद्रप्रमुख, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
खऱ्या अर्थाने या नवरत्नांची निवड करण्यासाठी रत्नपारखी म्हणून महत्त्वाची भूमिका निभावणारे परीक्षक गजानन वाभीटकर आ.कि.वि नारंडा, सलमा कुरेशी म.गां.वि.सोनुर्ली, सीमा कातकर साधन व्यक्ती BRC कोरपना व केंद्रातील शिक्षक यांच्या परिश्रमामुळे नवरत्नांची निवड करणे शक्य झाले असे केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी हितगुज साधकांना आपले मत व्यक्त केले.
यावेळी तब्बल प्रथम क्रमांकाचे ११ रत्न व द्वितीय क्रमांकाचे ६ रत्न सोनुर्ली शाळेत मिळाल्याने परिसरातील सर्व शाळा समाज आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रथम क्रमांक प्राथमिक – 1)कथाकथन- अंश रमेश चाटारे 2)स्वयंस्फूर्त भाषण- आकांक्षा छगन देरकर 3)वाद विवाद स्पर्धा -आकृशा छगन देरकर 4)एकपात्री भूमिका अभिनय- हिमानी देवेंद्र उरकुडे 5)सुंदर हस्ताक्षर स्पर्धा- सृष्टी रामदास जुमनाके 6)स्वयंस्फूर्त लेखन- आकांक्षा छगन देरकर 7)बुद्धिमापन स्पर्धा– आरोही संदीप नगराळे
प्रथम क्रमांक माध्यमिक – 1) स्वयंस्फूर्त भाषण – श्रावणी अविनाश चहारे 2) बुद्धिमापन स्पर्धा- कनिष्का कैलास कांबळे 3) चित्रकला स्पर्धा- स्वाती धम्मकिर्ती कापसे 4) सुंदर हस्ताक्षर स्पर्धा- आराध्या चंद्रप्रकाश दुर्गे
द्वितीय क्रमांक प्राथमिक – 1)चित्रकला स्पर्धा- आरोही संदीप नगराळे 2) स्मरणशक्ती स्पर्धा – उत्कर्षा नंदू पेंदोर
द्वितीय क्रमांक माध्यमिक – 1) वाद विवाद स्पर्धा – राणी विठ्ठल टोंगे 2)) एकपात्री भूमिका अभिनय – वृषभ भीमराव तेलंग 3) स्वयंस्फूर्त लेखन – आरोही जयसेन नगराळे 4) स्मरणशक्ती स्पर्धा – कनिष्का कैलास कांबळे
एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेले हे यश केंद्राचे केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य, शाळेतील शिक्षक विजय राऊत, विनायक राठोड, प्रभावती हिरादेवे, मेनका मुंडे, सुनिल अलोने, शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाची फलनिष्पत्ती आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक बोढे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे संचालन सुनिल अलोने, प्रास्ताविक केंद्रप्रमुख विलास देवाळकर व आभारप्रदर्शन विजय राऊत यांनी केले.