आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिवादन
घुग्घुस येथील दि.२० डिसेंबर शुक्रवार रोजी आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी बोलतांना माजी.उपसरपंच संजय तिवारी म्हणाले, संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील थोर संत,कीर्तनकार आणि समाजसुधारक होते.त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य लोकांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आणि जनजागृती करण्यात घालवले.संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या हयातीत महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांना स्वच्छता आणि शिक्षणाबाबत जनजागृती केली.२० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आम्ही येथे त्यांचे काही प्रेरणादायी विचार देत आहोत.
यावेळी माजी.उपसरपंच संजय तिवारी,पंचायत समिती माजी सभापती,निरीक्षण तांड्रा,माजी सरपंच संतोष नुने,अनिल बाम, मुन्ना लोडे,राजेंद्र लुटे,श्रीकांत मिसाला,सौरभ जागेट, सचिन सिरसागर,विलास भास्कर, सौ.उषाताई आगदारी, नितु जयस्वाल, निता मालेकर,सविता गोहणे, कामिनी देशकर, अनिता गोवर्धन आदी उपस्थित होते.