प्राॅपर्टी नकाशा व चौकशी नोंदवहीमध्ये खाडाखोड केल्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ…
आंबोली येथील रहिवासी शिवाजी चव्हाण यांचा भुमीलेख कार्यालयासमोर आज उपोषण
प्रतिनीधी / महेश कदम
सावंतवाडी, दि- १७ :– माहीती अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयात माहिती अधिकारामार्फत विनंती अर्ज करुनही प्राॅपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबतची माहितीची मागणी करुनही कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिल्याबद्दल आंबोली जकातवाडी येथील रहिवासी श्री.शिवाजी गोविंद चव्हाण यांनी भूमी अभिलेख कार्यालय सावंतवाडी येथे १७ डिसेंबर रोजी आज उपोषणाला बसले आहेत. यात त्यांनी पुढे म्हटले की, माझ्या मागणी प्रमाणे माझ्या प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेल्या बदलाबाबत व चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदलाबाबत व खाडाखोडीबाबत माहिती मला येत्या सात दिवसात उपलब्ध करुन द्यावी. अन्यथा मला नाईजालास्तव दि.१७/१२/२०२४ रोजी आपले कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागणार आहे. माझ्या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी हेच जबाबदार राहणार आहेत, असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.