आमदार देवराव भोंगळे यांचे जंगी स्वागत…
राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांनी नुकतीच विधानभवनात पद व गोपनियतेची शपथ ग्रहण केली; त्यानंतर आज त्यांचे राजुरा शहरात प्रथमच आगमण झाले. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राजुरा तालुका व शहर च्या वतीने स्थानिक जुना बसस्टँड चौकातील श्रीराम मंदिर परिसरात त्यांचे जंगी स्वागत करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या.
‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मी देखील कार्यकर्ता आहे हे मी माझे सद्भाग्य समजतो. कार्यकर्त्यांनी मनात ठरवलं तर ते काय करू शकतात याची प्रचिती राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक निकालाने सबंध महाराष्ट्राला आणून दिली; मी विजयी झालो. खरंतर त्यामागे तळागाळातील माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मोठा योगदान आहे. त्यांच्या प्रेमाला आणि आजच्या स्नेहपुर्वक स्वागताला मी कधीही उतराई होऊ शकणार नाही. आजच्या स्वातगाप्रसंगी फक्त एवढेच सांगेल, की येणारा काळ हा फक्त भारतीय जनता पक्ष-महायुतीचा व आमच्या कार्यकर्त्यांचा असणार आहे. पुणःश्र्च सर्वांचे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद!असे प्रतिपादन याप्रसंगी बोलतांना आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा चिटणीस संजय उपगण्लावार, तालुका महामंत्री वामन तुराणकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर, सतीश कोमरवेल्लीवार, शहर महामंत्री मिलिंद देशकर, सिनू पांझा, ॲड. नितीन वासाडे, राधेश्याम अडाणीया, विनोद नरेन्दुलवार, सुरेश धोटे, सईद कुरेशी, गणेश रेकलवार, सचिन बैस, भाऊराव बोबडे, मनोहर निमकर, जगदीश साठोणे, राजेश वाटेकर, सिनु उत्ननुरवार, राजकुमार भोगा, सिनु मंथनवार, रामराव वडस्कर, रवी ठाकुर, स्वप्निल राजुरकर, राहुल सपाट, अशोक झाडे, निखिल भोंगळे, बंडू वनकर, महादेव तपासे, संजय जयपुरकर, कैलास कार्लेकर, जनार्दन निकोडे, मनोहर आईटलावार, पुनम शर्मा, प्रणय विरमलवार, आकाश चिंचाळकर, सचिन बल्की, राजु निमकर, सचिन भोयर, राजकुमार डाखरे, दिपक झाडे, वैभव पावडे, अमोल सोनेकर, अंकुश कायरकर, मंगल चव्हाण, रावला रामास्वामी, अजय सकिनाला, अंकुश चव्हाण, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, महामंत्री शितल वाटेकर, ममता केशेट्टीवार, प्रियदर्शनी उमरे, योगीता भोयर, माजी नगरसेविका प्रिती रेकलवार, शुभांगी रागीट, गौरी सोनेकर, लक्ष्मी बिस्वास, शांता कदम, मंगला काळे, प्रिती शहा, रजनी बोढे, नैना परचाके, अल्का जुलमे, दिपा बोंथला, प्रतीक्षा पिपरे, यांचेसह इतर प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्यने तालुका व शहरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.