घुग्घुस शहराचे सिटी सर्वे करा – पवनकुमार आगदारी
घुग्घुस नगरपरिषदेची स्थापना २०२० मध्ये झाली असुन नगरपरिषदेची स्थापना होऊन जवळपास ४ वर्षाचा कालावधी होवुन सुध्दा घुग्घुस शहराच्या सिटी सर्वे झालेल्या नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. तसेच नागरिकांचे कोणतेही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकामध्ये असंतुष्ट निर्माण होत आहे. म्हणून घुग्घुस शहराचा सिटी सर्वे झाल्यास नागरिकांना स्थानिक पातळीवर त्यांचे कामे करण्यास सोईस्कर होईल. अशी मागणी निवेदनातून घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांनी केली.