महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

0
24

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

 

राजुरा:विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राजुरा येथील नवीन बस स्टँड समोरील बुद्ध भूमी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था मागील सात वर्षांपासून समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करत आहे. संस्थेचा उद्देश रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे व समाजात मानवतावादी दृष्टिकोन वाढवणे हा आहे.

 

यावर्षीचे रक्तदान शिबिर दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन दुपारी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

नागवंश युथ फोर्स केवळ रक्तदान शिबिरेच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमही सातत्याने राबवत आहे. संस्थेने आपली समाजसेवेतील ओळख मजबूत केली असून, तिचे कार्य कौतुकास्पद आहे.

 

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल राऊत, उपाध्यक्ष रविकिरण बावणे, सचिव धनराज उमरे, नूतन ब्राम्हणे, सुरेंद्र फुसाटे, जय खोब्रागडे आणि रवी झाडे यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

— नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here