एमआयडीसी (MIDC) येथे सात दिवस कृत्रिम शिबिराचे आयोजन समारंभ
लॉईड्स इंफिनाइट फाउंडेशन, घुग्घुस आणि एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमाचा भाग म्हणून ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चंद्रपूर येथे प्रोस्थेटिक लिंब कॅम्प चालू केला होता. या शिबिराचा चंद्रपूर व परिसरातील २०० हून अधिक दिव्यांग यांनी लाभ घेतला. लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर सेवा सदन समिती कलकत्ता केंद्राने आयोजित केलेला, हा आठवडा भर चाललेला उपक्रम दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात गतिशीलता आव्हानांसह सक्षम आणि परिवर्तन घडवुन आणेल.
हे शिबिर ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत चालवले असून ५०० हून अधिक लाभार्थ्याना कृतीम अवयव, मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे आणि इतर मदत देणे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी मोहिमेंतर्गत औद्योगिक कर्मचारी व औद्योगिक क्षेत्रातील व चंद्रपूर येथील उद्योग नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव, कॅलिपरचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला संबोधित करताना श्री. प्रशांत पुरी (वरिष्ठ उपाध्यक्ष), श्री. वायजीएस प्रसाद (युनिट हेड), लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड म्हणाले, “समाजाला परत देणे हे आमच्या ग्रुप कंपनीचे ध्येय आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी क्रियाकलाप आम्ही ज्या समुदायांमध्ये काम करतो त्या समुदायातील लोकांसाठी आमच्या उपजीविका समर्थन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करतो. आमची संस्था आम्ही संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनाचा दर्जा वाढवणाऱ्या आणि त्यांची भरभराट करण्याची क्षमता वाढवणाऱ्या सुविधा पुरवून त्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.