आमदार बंटीभाऊ भांगडीया शेतकऱ्यांच्या बांधावर
धान पिकांचे फेरपंचनामे करण्याची मागणी : आमदार बंटी भाऊ भांगडीया
मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील धानपिकांची केली पाहणी
विकास खोब्रागडे
चंद्रपूर । शेतकऱ्यांच्या विविध पिकांना विविध रोगांना ग्रासले असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल होत असल्याने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी मासळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील विहिरगाव शेतशिवारातील बांधावर जाऊन कापूस धान पिकांची पाहणी केली . शेतपिकांची पाहणी करीत असताना आमदार बंटीभाऊ भांगडीया सोबत भाजपचे प्रदेश सदस्य वसंत वारजुकर,राजू देवतळे, भाजपचे जीप क्षेत्र प्रमुख प्रवीण गणोरकर नगरसेवक सतीश जाधव, समीर राचलवार भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुगले, टीमु बलदवा ,असिफ शेख ,विकी कोरेकर , माजी पस वर्षा लोणारकर, अशोक देवतळे ,कृषी अधिकारी तिखे तसेच शेतकरी वर्गआदी उपस्थित होते.आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी विहिरगाव ,पळसगाव ,पीपरडा या गावातील शेतकऱ्यांच्या बांधात जाऊन व धान कटाई झालेल्या डीबली ची सुद्धा प्रत्यक्ष पाहणी करीत कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेशी सुद्धा भ्रमणध्वनी वरून पाठविण्यात आलेले पंचनामे रद्द करून नवीन फेर पंचनामे करण्याची सूचना केली.राज्यातील महाविकास आघाडी शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असून कृषी विभाग चिमूर यांनी चिमूर तालुक्यातील धान पीक मावा तुडतुडा ग्रस्त झाल्याने केवळ १० टक्के नुकसान होणार असल्याचा अहवाल शासनाला पाठविला असल्याने तो अहवाल चुकीचा असल्याचे सांगत कृषी प्रशासनाने फेर चौकशी करीत पंचनामे करून मदतीचा अहवाल शासनाला पाठविण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली .