वृक्ष हेच मानवाचे खरे मित्र – राजेशकुमार रॉय
वाढदिवसानिमित्त बेलोरा – नायगाव खाणीत वृक्षारोपण…
घुगुस :- कोणत्याही अपेक्षा न करता वृक्ष हे मानवाला व सर्व सजीव प्राणीमात्राला ऑक्सिजनरुपी मदत करुन त्यांचे जिवन देतात. मात्र मानव हा कृतघ्न होऊन त्यावर घाव घालतो. पर्यावरणाचे महत्व ओळखून मानवाने जास्तीत जास्त वृक्ष लाऊन त्याचे संगोपण केले पाहिजे असे मत बेलोरा – नायगाव खाणीचे सर्वे अधिकारी राजेशकुमार राय यांनी व्यक्त केले. राय यांचा वाढदिवस खाणीतील ऊद्यानात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला यानिमित्ताने ते बोलत होते.
यावेळी मनोजकुमार, सुनील बिपटे, प्रकाश जेऊरकर, ज्ञानेश्वर लेडांगे, विशाल क्षिरसागर, प्रज्वल नागपुरे, संजय बोंडे, दिलीप वाढई, कलावती राडे आदिंची ऊपस्थिती होती. यावेळी कार्यालय परीसरात गुलाब, ख्रिसमस ट्री, जास्वंद, शेवंती, लिंबू, अमृत आदी फुलझाडांचे देखील वृक्षारोपण करण्यात आले.