भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाची नविन कार्यकारणी घोषीत
युनियनच्या अध्यक्ष पदी विवेक अल्लेवार तर महामंत्री राजास्वामी जंगम यांची निवड
घुग्घुस येथील लाॅयड्स मेटल्स उद्योगात अंदाजे वीस वर्षांपूर्वी भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ,घुग्घुस रजि.नं.एन.जी.पी.४७५९ (संलग्न भारतीय मजदूर संघ) युनियनची स्थापना करण्यात आली.
तेव्हापासून स्थायी व अस्थायी कामगार मिळून कार्यकारिणी बनायची आणि ती सुरळीत रित्या कार्य करायची.पण आज ईतक्या दिवसानंतर फक्त स्थायी कामगार कार्यकारिणीची पुर्नरघटन करण्यात आले.
आजच्या घडीला स्थायी व अस्थायी ठेकेदारी कामगांंराचे स्पंज आर्यन कंपन्यांकडून शोषण होत आहे,अनेकानेक कंपन्यात जास्त शेकडोच्या वर अस्थायी कामगार आहे,कुठेतर मोचके स्थायी कामगार आहे.या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी युनियनच्या माध्यमातून संघर्ष करण्याची खूप गरज आहे.
संघर्षासाठी युनियन नेहमी तयार राहील.त्यासाठी स्थायी व अस्थायी ठेकेदारी कामगारांनी युनियनला तन,मन,धनानी सहकार्य करावे राजास्वामी जंगम महामंत्री यांनी आव्हान केले आहे.
नविन कार्यकारिणीत प्रभारी- रमेश बल्लेवार (मानसेवी) अध्यक्ष- विवेक अल्लेवार,कार्याध्यक्ष- राजेंद्र क्षीरसागर, उपाध्यक्ष- संतोष चिंत्तला,युसुफ शेख,मनोज आत्राम,महामंत्री- राजास्वामी जंगम, मंत्री- सुनिल लठ्ठा,पृथ्वीराज आगदारी, पंकज रामटेके,रवि वर्मा संघटन मंत्री- वसंत क्षीरसागर (मानसेवी),कोषाध्यक्ष- प्रदिप पिल्लारे, प्रचार प्रसार प्रमुख – अविनाश बुटले,कार्यालय मंत्री- विजय माथनकर कार्यकारिणी सदस्य- अशोक भोयर,पुंडलिक डांगे, विकास ठेंगणे,सचिन ठाकरे,सेहवाल हुसेन, मंगेश राजुरकर, विजय भोयर, राकेश सलामे आहे.
हि नविन कार्यकारिणीची घोषणा प्रदेश महामंत्री विदर्भ प्रदेश नागपूर श्री.गजानन गटलेवार,उपाध्यक्ष प्रमोद येलचलवार व जिल्हाध्यक्ष चंद्रपूर बंडू हिवरे,जिल्हामंत्री पवनजी ढवळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अनेकानेक वर्षानुवर्ष गेले स्थायी कामगारातुन महामंत्री राहायचा पहिल्यांदाच भारतीय मजदूर संघातुन अस्थायी कामगारातुन महामंत्री बनविण्यात आले व सर्व कामगार संघाकडून समोरच्या वाटचालीस हार्दिक अभिनंदन करण्यात आले.