घुग्घूस शहरात बतकम्मा उत्सव उत्साहात साजरा
उत्कृष्ट बतकम्माला काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी तर्फे पुरुस्कार वितरण
घुग्घूस : बतकम्मा हा विशेषता तेलंगना व आंध्र प्रदेश येथील महिलांन तर्फे साजरा केला जाणारा हिंदू फुल उत्सव आहे. दरवर्षी हा सण सत्यवाहन दिनदर्शीके नुसार पितृ अमावस्येपासून नऊ दिवस साजरा केला जातो.
‘बतकम्मा याचा अर्थ माता देवी जिवंत हो’ असा आहे. यामध्ये महिला पारंपरिक वेशभूषा व दागिने घालून फुलांचा सुंदर असा गठ्ठा निर्माण करतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या हंगामी फुलांचा समावेश असतो घुग्घूस शहर हा मिनी इंडिया असल्यामुळे शहरात तेलगू भाषिक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
शहरातील तिलक नगर, सुभाष नगर, गांधीनगर, साई नगर व अन्य ठिकाणी बथुकम्मा उत्सव साजरा करण्यात आला.
सुभाष नगर तसेच साई नगर येथील बथुकम्मा उत्सवात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने उत्कृष्ट बथुकम्मा प्रतिकाला पुरुस्कार देण्यात आला. सुभाष नगर येथे प्रथम पुरुस्कार सुप्रिया पोलू राजेश द्वितीय पुरुस्कार नरा स्वरूपा व तृतीय रेणुका नुने यांना प्राप्त झाला तर साईनगर येथे प्रथम पुरुस्कार वजरा लक्काकुला द्वितीय सपना सिद्धम व तृतीय मेडशील्ली मॅडम यांना प्राप्त झाला. याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, शरद कुम्मरवार,रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.