स्वाती मिश्रा यांच्या भक्तिगीतांनी महाकाली महोत्सवात भक्तिरसाची उधळण

0
52

स्वाती मिश्रा यांच्या भक्तिगीतांनी महाकाली महोत्सवात भक्तिरसाची उधळण
सायबर सेलचे महिलांना मार्गदर्शन, नवरात्रीत जन्मलेल्या कन्यांना चांदीचा शिक्का वाटप

श्री माता महाकाली महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांनी भक्तिरसाने ओथंबलेल्या सुरांनी वातावरण भक्तीमय केले. त्यांच्या भक्तिगीतांनी महाकाली महोत्सवाला आध्यात्मिक उधाण दिले. स्वाती मिश्रा यांचे गायन ऐकण्यासाठी शहरातील हजारो भाविकांनी महोत्सवात हजेरी लावली होती. स्वाती मिश्रा यांच्या भक्तिगीतांनी महाकाली महोत्सवात भक्तिरसाची उधळण झाली.
सायंकाळच्या आरतीनंतर स्वाती मिश्रा यांच्या भक्तीगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. “राम आयेंगे” या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वाती मिश्रा यांनी आपल्या ओजस्वी आवाजात गीतांची स्वरमाला गुंफत उपस्थितांना भक्तिरसात न्हाहून काढले. स्वाती मिश्रा यांच्या सुरेल आवाजातील गोडवा आणि त्यांच्या गाण्यांमधील भक्तिभावनेचा ओलावा यामुळे प्रत्येक श्रोत्याने भक्तिरसाचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्वाती मिश्रा यांचा मातेची मूर्ती देऊन सन्मान केला.
तर दुपारी 999 माऊलींचा पातळ देऊन सन्मान करण्यात आला. दुपारी 1 वाजता सूर्योदय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने जागर कवितेचे महिलांचे कवी संमेलन पार पडले. दुपारी 3 वाजता स्थानिक कलावंतांच्या नृत्य जल्लोष कार्यक्रमाने नृत्य प्रेमींना नृत्यकलेची अनुभूती दिली. तर नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांचा चांदीचा शिक्का देऊन गौरव करण्यात आला.

उद्याचे कार्यक्रम –
सकाळी 9 वाजता महाआरतीने कार्यक्रमांना सुरुवात होईल. नंतर गायत्री परिवाराच्या वतीने शक्ती संवर्धन व पर्यावरण संरक्षण महायज्ञ होणार आहे. तर सायंकाळी 4 वाजता महाकाली मंदिर येथून श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला प्रारंभ होणार असून यात “मुझे चढ गया भगवा रंग” या गाण्याच्या गायिका शहनाज अख्तर यांचा रोड शो असणार आहे.

भिक्खु संघाच्या वतीने अम्माच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
सध्या वर्षवासाचा पवित्र महिना सुरू आहे. त्या निमित्ताने महाकाली महोत्सवात भिक्खु संघाला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांना चिवर व फळदान करण्यात आले. भिक्खु संघाने अम्माच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाचे सचिव पूज्य भदंत महाथेरो सुमणवंन्नो, महाथेरो नागदीपंकर, संघवंश थेरो, आनंद थेरो, प्रज्ञानंद, गनानंद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here