मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हरामखोर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणारचं – चित्राताई वाघ महिला प्रदेश अध्यक्षा भाजपा
आश्चर्य या विषयावर राज्यातील विरोधी पक्षाच्या सगळ्या ताई मूग गिळून गप्प… साधा निषेधही यांच्या तोंडून निघू नये ???
चित्राताई वाघ यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट…
कोरपना – शिक्षक ज्याला आपण आई-वडीलानंतर गुरु मानतो. त्या गुरुने लहान लहान मुलींसोबत लैंगिक शोषण केले आहे. अतिशय गरीब कुटुंब असून मजूरी करून आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. या मुलीच्या हिमतीला दाद दिली पाहिजे ती स्वतः समोर आली. खूप लोकांनी दबाव टाकला परंतू तिने दबावाला न घाबरता समोर येवून गुन्हा दाखल केला. इतरही मुलीचे शोषण केल्याची माहिती आहे ती लवकरच पुढे येईल. महिलांनी न घाबरता पुढे यावे सरकार आपल्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील कोरपना अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आज आल्या होत्या. भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी, या प्रकरणात एकही शब्द न बोलणाऱ्या विरोधी पक्षातील महिला नेत्यांवर टीका केली. बारामती, सोलापूर, अमरावती, मुंबईच्या काँग्रेसच्या ताई याप्रकरणी बोलल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे त्या म्हणाल्या. विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे केवळ राजकारण करणारी ही मंडळी आहे आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर आलाय, असे वाघ म्हणाल्या. यावेळी राहुल गांधी यांच्यावर वाघ यांनी निशाणा साधला. मोहब्बत की दुकानात काय चाललंय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आरोपी काँग्रेसचा पदाधिकारी होता. त्याचे नियुक्ती पात्र खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिले. धानोरकर या एक महिला आहेत. मात्र या घटनेवर त्यांनी एक चक्कार शब्द बोललेला नाही. याचं मला आश्चर्य वाटतं. हे तेच धोटे आहेत जे पाच वर्षांपूर्वी जेल मध्ये होते. त्यांच्या आश्रम शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार घडला होता.
यावेळी कोरपना येथील एका शाळेतील शिक्षकाकडून शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजपा महिला आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयाची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी घडलेला प्रकार सविस्तर जाणून घेतला. तसेच त्यांनी या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्यासोबत भावनिकरित्या धीर सुद्धा दिला.
याप्रसंगी त्यांच्या समवेत निवडूणक प्रमुख राजुरा विधान सभा क्षेत्र देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, महिला भाजपाच्या अल्का आत्राम आदी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या भेटीत कुटुंबीयांना कुठलीही भीती न बाळगण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पिडीतेच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी सुद्धा उचलली जाईल. याबाबत आश्वस्त केले.