भाजपकडून गणेश मंडळांचा सन्मान व भक्तांना महाप्रसादाचे वितरण

0
8

भाजपकडून गणेश मंडळांचा सन्मान व भक्तांना महाप्रसादाचे वितरण

 

राजुरा, दि. १९
भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय च्या वतीने काल (दि. १८) शहरातून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांचा सन्मान आणि गणेशभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या नक्षत्र मॉल शेजारी भाजपतर्फे उभारलेल्या स्वागत मंडपात विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी मिरवणूकीत सहभागी झालेल्या सर्वच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार भेट देऊन स्वागत केले. याचवेळी मिरवणूकीत आलेल्या हजारो गणेशभक्तांना भव्य महाप्रसादाचे वाटप ही भाजपकडून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी, श्रीगणेश मिरवणूक निर्विघ्न पार पाडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचा सत्कार करून पोलीस बांधवांचे आभार ही मानण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, तालुका महामंत्री वामन तुराणकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर, जिल्हा सचिव संजय उपगण्लावार, मिलिंद देशकर, मंगेश श्रीराम, सिनू पांझा, राधेश्याम अडाणीया, नितीन वासाडे, सचिन डोहे,भाऊराव चंदनखेडे, सिनू उत्नुरवार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, संजय वासेकर, भारत शेडमाके, छबिलाल नाईक, दिपक झाडे, आकाश गंधारे, प्रणय विरमलवार, राजकुमार भोगा, किशोर रागीट, आकाश चिंचाळकर, रवी ठाकुर, सुरेश धोटे, राजु डोहे, विनोद नरेन्दुलवार, महेश रेगुंडवार, प्रकाश बोनगिरवार, रत्नाकर पायपरे, कैलास कार्लेकर, अश्विन माऊलीकर, मनोज कोल्हापूरे, रामा घटे, मयुर उपलंचिवार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, महामंत्री गौरी सोनेकर, उज्ज्वला जयपुरकर, माजी नगरसेविका प्रिती रेकलवार, शुभांगी रागीट, ममता केशट्टीवार, योगीता भोयर, सिमा देशकर, नैना परचाके, रजनी बोढे, लक्ष्मी बिस्वास, राधा विरमलवार, सविता खनके, सचिन भोयर, राजु निमकर, प्रवण मसादे, मयुर झाडे, मिथुन थिपे, निलेश भोयर, जुगल भटारकर, सुशील कल्लुरवार, मयुर बोनगिरवार, अमोल चिल्लावार, अमोघ कल्लुरवार, निखिल पिपरे, समीर बेदावार, सुनील गादेवार, लक्ष्मी तन्नीरवार यांचेसह अनेकांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here