पंतप्रधान मोदीजींचे व्यक्तित्व हे तळागळातील जनतेच्या समाधानासाठी अविश्रांत झटण्याची प्रेरणा देणारे! – देवराव भोंगळे

0
11

पंतप्रधान मोदीजींचे व्यक्तित्व हे तळागळातील जनतेच्या समाधानासाठी अविश्रांत झटण्याची प्रेरणा देणारे! – देवराव भोंगळे

भाजपतर्फे भव्य मोफत चष्मेवाटप शिबीराने सेवा पंढरवड्याची सुरवात

 

राजुरा, दि. १७ :- भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, देश आणि देशवासीयांच्या जिवनात समृद्धी यावी, गोरगरिबांच्या चेहर्‍यावर समाधानाचा भाव फुलावा म्हणून पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून आजतागायत अविश्रांत झटणारे व्यक्तिमत्व म्हणून विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी हे जगाला परीचीत झाले आहेत. मा. मोदीजींचे विकासाभिमुख असे संवेदनशील नेतृत्व आणि त्यांच्यातील कर्मयोगी राष्ट्रभक्तीने सबंध जगाला भुरळ घातली आहे. असे प्रतिपादन भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.

राजुरा येथील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राजुरा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने आयोजित भव्य मोफत चष्मेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात डोळ्यांची तपासणी केलेल्या १००८ रुग्णांना चष्मांचे वाटप करण्यात येणार आहे.

पुढे बोलताना, सर्वांना ज्ञात आहे मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या विकासासाठी मरगळ झटकून निघाली आहे. मागील दहा वर्षांपासून नव्या आत्मनिर्भर व विकसित भारताच्या निर्माणासाठी केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात समाजातील शेवटच्या प्रगती डोळ्यासमोर ठेवून लोककल्याणकारी योजनांची आखणी व प्रभावी अंमलबजावणी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री शौचालय योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, एक रुपयात पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, जलजिवन मिशन, मोफत अन्नधान्य योजना, आयुष्यमान भारत योजना अशा कितीतरी क्रांतिकारी योजना सुरू करून मोदी सरकारने देशातील सामान्य कुटुंबांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. मी आजच्या निमित्तानं मा. मोदीजींना अवीरत राष्ट्रकार्यासाठी निरोगी व उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले.

खरंतर आज राजुरा मुक्तीसंग्राम दिन देखील आहे. निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात मराठवाडा मुक्ती संग्रामात या भागातील जनतेने दाखवलेल्या शौर्याला आणि केलेला संघर्षाला नमन करण्याचा दिवस. यानिमित्तानं मी सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना अभिवादनही करतो. यासोबतच आजपासून येत्या ०२ आक्टोंबरपर्यंत भाजपतर्फे सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत आहे. या पंढरवड्यांतर्गत विविध सेवा उपक्रमांची आखणी आपण करणार आहोत. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक उर्जावान कार्यकर्त्यांनी होणाऱ्या विविध सेवा उपक्रमांत सक्रियता दाखवावी, असे आवाहन ही त्यांनी आपल्या मनोगतातून केले.

याचवेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने निघालेल्या लाभार्थी सन्मान यात्रेला हिरवी झेंडी दाखवून विधानसभा क्षेत्रात मार्गस्थ करण्यात आले.

या कार्यक्रमाला गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, तालुका महामंत्री वामन तुराणकर, महामंत्री बाळनाथ वडस्कर, शहर महामंत्री सचिन डोहे, ॲड. नितीन वासाडे, सिनू पांझा, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, महामंत्री योगीता भोयर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, सुरेश धोटे, किशोर रागीट, राजकुमार भोगा, संजय वासेकर, रमेश निवलकर, माणिक देठे, भाऊराव चंदनखेडे, श्रीनिवास मंथनवार, शंकर धनवलकर, अर्जुन पायपरे, दिपक झाडे, निलेश वाढई, गुलाब मंदे, सुभाष रासपल्ले, आकाश चिंचाळकर, रामा घटे, गणेश वाघमारे, अशोक चांदेकर, बाबुराव जिवणे, कृष्णावतार संभोज, भाऊराव बोबडे, हर्षल वनकर, रोशन बोबडे, विक्रम नागोसे यांचेसह आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here