७२ वर्षीय पुरुषाची लैंगिक सुखाची मागणी : पोक्सो अंतर्गत कारवाई करा मनसे शहराध्यक्ष यांची मागणी
बल्लारपूर :- शहरात ७२ वर्षीय पुरुषाने दोन नाबालिक युवतीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटना मनसे बल्लारपूर पदाधिकारी यांना माहिती होताच मनसे पोलीस स्टेशन गाठून कारवाईची मागणी केली. महिला आघाडी शहराध्यक्ष अरुणा तोडसाम यांनी बल्लारपूर पोलीस निरीक्षक सुनील गाडे हे बाहेर असल्यामुळे त्यांच्यासोबत दूरध्वनी संपर्क करून अशा लिंगपिसाट नरभक्षीवर कठोर कार्यवाही करून तातडीने गुन्हे नोंद करण्याची विनंती केली.
बल्लारपूर येथील रविंद्रनगर वार्ड मधील ७२ वर्षीय आरोपी याने त्याचे घरी किरायाने राहत असलेल्या कुटुंबातील सतरा वर्षीय तसेच पंधरा वर्षीय पिडीतेकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. फिर्यादी मुली आपल्या परिवारासहित किरायाने राहतात. घरमालकाने त्या दोन्ही मुलींना २०० रूपये व ५०० रुपये दिले होते. घरमालकाने त्यांना पैसे चे बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याची फिर्याद पोलीस स्टेशन येथे केली आहे.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिसांनी बल्लारपूर येथे अप क्रमांक ८९३/२४ कलम ७५ (१)(१), ७५(१)(२), ७५ (२), ३३२(क )भारतीय न्याय संहिता सह कलम ८, १२ लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष उमेश कुंडले, बल्लारपूर महिला आघाडी शहराध्यक्ष अरुणा तोडसाम, मोहन राजभर, विजेंद्र परमार, मनोज तोडसाम, सलमान शेख, संदीप मडावी आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहे.