राजूरा: डॉक्टरच्या वेषात सैतानाचा उघडपणा – रुग्णांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

0
141

राजुरा शहरात डॉक्टरच्या वेषात सैतानाचा उघडपणा – रुग्णांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

राजुरा: निजामकालीन ऐतिहासिक शहर राजुरा, जे कधी शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीसाठी प्रसिद्ध होते, ते आज एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आले आहे. एका डॉक्टरने आपल्या पेशेच्या मर्यादांचा उल्लंघन करत, एका महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेने राजुरासारख्या शांतिप्रिय शहरात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित महिला PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) च्या उपचारासाठी संबंधित डॉक्टरकडे गेली होती. तपासणीच्या नावाखाली, डॉक्टरने तिला क्लिनिकच्या आतल्या खोलीत एकटीला नेले, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तपासणीदरम्यान कोणतीही नर्स उपस्थित नव्हती. डॉक्टरने आपल्या पदाचा गैरफायदा घेत, पीडित महिलेच्या शरीराला अनुचित स्पर्श केला. पीडित महिलेने धाडसाने संपूर्ण प्रसंग सहन करून लगेच बाहेर येऊन आपल्या मैत्रिणीला या बाबत माहिती दिली.

या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि या प्रकारावर महिला वर्गात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

ही एक घटना अपवादात्मक नाही, असे जाणवते. राजुरा हे आदिवासी बहुल विधानसभा क्षेत्र असल्यामुळे, झोलाछाप डॉक्टरांचा धंदा येथील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. योग्य वैद्यकीय शिक्षण नसलेले डॉक्टर्स बिनदास्तपणे रुग्णांवर उपचार करत आहेत. होमिओपॅथीच्या डिग्रीवर अलोपॅथी औषधांचा वापर केला जात आहे, तर अनेकदा रुग्णांना अनावश्यक रक्त तपासण्या फक्तं कमिशन पोटी आणि सलाईन देऊन जास्त बिल आकारले जात आहे.

डॉक्टरकी पेशा, जे कधी रुग्णसेवेचे प्रतिक होते, आज मात्र फक्त पैसे कमावण्यासाठी एक साधन बनले आहे. रुग्णांच्या आजाराचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. अनेक डॉक्टर्स आपल्या वैद्यकीय नैतिकतेला तिलांजली देऊन या व्यवसायात आपले हित साधत आहेत.
महिला रुग्णांवर लैंगिक शोषण करण्याचे प्रकारही सातत्याने उघडकीस येत आहेत. काही महिन्यांपूर्वी, एका तरुणीवर अशाच प्रकारचा अत्याचार होता होता राहिला, जिथे डॉक्टरने तिला शरीरसुखाची मागणी केली. जर तिने विरोध केला तर तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे महिला रुग्णांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. अशा घटनांमुळे डॉक्टरच्या पवित्र पेशावर काळिमा फासली जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल राऊत यांनी महिलेच्या तक्रारीवर महिला आयोगाला पत्र लिहून, इंडियन मेडिकल कौन्सिलमध्ये तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी महिलेची सर्वतोपरी मदत करू, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

राजुरासारख्या शहरात अशा विकृत मानसिकतेच्या डॉक्टरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, आणि महिला संघटनांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा दोषींवर योग्य कारवाई होऊन कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

हा प्रकरणाचा पहिला भाग आहे. पुढील काही दिवसांत वाचकांना या घटनेच्या दुसऱ्या भागाची आणि न्यायाच्या लढाईची अधिक माहिती मिळेल. दोषींवर कठोर कारवाई होऊन योग्य न्याय मिळवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे.

डॉक्टरांच्या पवित्र पेशावर झालेल्या या घृणास्पद घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, सर्व संबंधित संस्थांनी एकत्र येऊन योग्य न्याय मिळवून, या पेशाच्या पवित्रतेचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आजच्या काळात सर्वांत महत्त्वाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here