डॉक्टर ने स्वतःचे रक्त दान करून वाचविले गंभीर जख्मी रुग्णाचे प्राण

0
123

डॉक्टर ने स्वतःचे रक्त दान करून वाचविले गंभीर जख्मी रुग्णाचे प्राण

 

चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथील घटना

 

 

 

विरूर स्टेशन/अविनाश रामटेके 

एकीकडे डॉक्टरना देवा प्रमाणे दर्जा दिला जातो मात्र आज खाजगी डॉक्टर ची लूट पाहता जणसामनात याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, कारणही तसेच आजच्या खाजगी महागाड्या वैदकीय खर्च पाहता गरीब वर्गातील सदस्य हा हतबल होऊन तोकड्या सेवा असलेल्या सरकारी रुग्णालयात धाव घेतो व आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न्य करतो मात्र कधी कधी त्यावेळी संबधीत सरकारीयंत्रणा सुद्धा अपूर्ण सुविधा अभावी रुग्णाचे थातूर मातुर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करताना आपण नेहिमी पाहत असतो मात्र अपुरे साधनसामुग्री व औषधं चा तुटवडा या विवेचनातून गरिबांना आरोग्य सेवा मिळत असते, हे जरी नित्याचे असले आहे तरी आज जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाची क्रीटीकल स्थिती पाहता आपले स्वतःचे रक्त देऊन एका जख्मी युवकांचे प्राण वाचविल्याची प्रेरणादायी घटना घडली, चंद्रपूर मेडिकल कालेज ला एम बी बी एस ला शिकत असलेला एका ट्रेनिं डॉक्टर ने तात्काळ आपले स्वतःचे रक्त दान करून रुग्णाचे प्राण वाचवील्याने त्या शिकाऊ डॉक्टर चे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे

 

यात विस्तृत असे कि चिमूर येथील रोहित बुदेवार वय 24 हा आपल्या मित्रासह दुचाकी वाहणाने चंद्रपूर येथे येत असताना त्याचे तोल जाऊन वाहन स्लिप होऊन पडले दरम्यान दोघांना ही गंभीर दुखापत झाली मात्र रोहितला डोक्याला जबर मार लागल्याने सतत कानातून व डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता दरम्यान कसे बसे त्याच्या मित्राने त्याच स्थितीत त्याला ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारा करिता घेऊन आला प्राथमिक उपचारानंतर रुग्णाची स्थिती पाहता त्याला त्वरित ए बी निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती, ए बी रक्तगट हे फार कमी प्रमाणात भेटत असल्याने रक्तासाठी शोधाशोध सृरू केली मात्र सर्वीकडे शोधाशोध करून सुद्धा रक्त उपलब्ध होत नव्हते व इकडे रुग्णाची स्तिथी अधिकच गंभीर होत होती तेव्हा मेडिकल कालेज चंद्रपूर येथे एम बी बी एस ला शिकत असलेला सिनियर स्टुडन्ट डॉ. स्पंदन शाहू नारनावरे यांनी स्वतःच त्या गंभीर जख्मी रुग्णालाआपले ए बी निगेटिव्ह असलेले स्वतःचे रक्त दान करून त्या रुग्णाचे प्राण वाचविले त्यामुळे डॉ स्पंदन च्या या कार्यामुळे सर्वत्र स्तुती होताना दिसून येत आहे व महत्वाचे म्हणजे डॉ स्पंदन हा विरूर स्टेशन येथील असल्याने परिसरात तो प्रेरणादायी ठरत असल्याचे बोलल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here