घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार
रेल्वे अधिकारी, वेकोली अधिकारी, काँग्रेस पदाधिकारी यांची संयुक्त चौकशीत तोडगा निघाला
घुग्घुस – वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे गंजले असल्याने रेल्वे विभागाने हा पूल धोकादायक असल्याचे लक्षात घेवून एक महिन्यांपूर्वी बंद केला.
राजीव रतन रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यामुळे याठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण होते.
यामुळे लोखंडी पूल सुरू असणे शहरातील नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याने हा शुरु करावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर व पदाधिकाऱ्यांनी केली व सतत पाठपुरावा केला तसेच नागरी सत्कार कार्यक्रमा करीता शहरात आलेले खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच आमदार सुभाष भाऊ धोटे यांना ही व्यापारी मंडळाने लोखंडी पूल शुरु करण्यासाठी निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने आज दिनांक 21 जून रोजी रेल्वे विभागाचे अधिकारी ए,डी,एम सुबोध कुमार,आय,ओ, डब्ल्यू राजूरकर वेकोलीचे सब एरिया सुधाकर रेड्डी व काँग्रेस पदाधिकारी यांनी संयुक्तपणे पुलाची पाहणी केली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या दुरुस्तीला लागणाऱ्या रकमेचा अंदाज पत्रक (इस्टिमेंट) तातळीने वेकोली अधिकाऱ्यांना देतील व वेकोली अधिकारी तातळीने ही रक्कम मंजूर करून दुरुस्ती कार्याला सुरुवात करतील असा संयुक्तपणे निर्णय घेण्यात आला सदर दुरुस्ती नंतर या पुलाचे आयुष्यमान पंधरा ते वीस वर्षांनी वाढेल असा आशावाद रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी काँग्रेस नेते अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,नुरुल सिद्दीकी,हरीश कांबळे व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.