वेकोलीचा लोखंडी पूल दुरुस्ती करून तातळीने सुरू करा : इंडिया आघाडीची मागणी
रेल्वे व वेकोली अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा व नियोजन
घुग्घुस : वेकोली वसाहतीला वस्तीशी जोडणारा जुना लोखंडी रेल्वे पूल रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने तडकाफडकी बंद केले.
शहरात आधीच रेल्वे उड्डाणपूलाचे काम चालत असल्याने वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे गेटमुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
पारा 48 ते 50 डिग्रीच्या जवळपास पोहचत असल्याने वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरीकांच्या जीवितेला उष्माघाताने धोखा निर्माण झाला आहे.
यामुळे नागरिकांच्या सुविधे करिता पायदळ व दुचाकी वाहना करिता लोखंडी पूल शुरु असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने आज दिनांक 31 में रोजी इंडिया आघाडी काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने यामध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी,काँग्रेस नेते सैय्यद अनवर, उबाठा नेते गणेश शेंडे,सुधाकर चिकणकर,आम आदमी शहर अध्यक्ष अमित बोरकर,राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप पिटटलवार,युवा नेते शरद कुम्मरवार,काँग्रेस नेते अलीम शेख,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,यांनी रेल्वे विभागाचे बल्लारपूर येथील अधिकारी सुबोध कुमार यांच्याशी चर्चा केली.
त्यांनी वेकोलीने पुलाची दुरुस्ती केल्यास आम्ही परवानगी देऊ असे सांगितले असता शिष्टमंडळाने वेकोली सब एरिया मॅनेजर सुधाकर रेड्डी, आनंद ठाकरे, व एस.पी.बल्लेवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी रेल्वेने सुचविलेल्या दुरुस्ती करण्यास सकारात्मक होकार दर्शविला बल्लारपूर येथील आय.ओ.डब्लू चौकशी साठी येतील व दुरुस्ती सुचवतील व दुरुस्ती नंतर सदर लोखंडी पूल नवीन पूल निर्माण होण्या पर्यंत वापरात आणला जाण्याची शक्यता आहे.