सीएमपीएल वोल्वो ऑपरेटर कामगारांचे धरणे आंदोलन

0
136

सीएमपीएल वोल्वो ऑपरेटर कामगारांचे धरणे आंदोलन

आंदोलक कामगारांना अटक

चंद्रपूर :- सीएमपीएल माती उतखन कंपनी चे पवनी साखरी वेकोली WCL एरियातील काम संपल्याचे कारण समोर करून कंपनीने येथील सर्व स्थानिक कामगारांना दुसऱ्याठिकाणी काम मिळाल्यावर कामावर घेण्यात येईल असे पत्राद्वारे कळवून वाल्वो ऑपरेटर कामगारांना कामावरून कमी केले. सीएमपीएल कंपनीला सास्ती वेकोली WCL एरियात नवीन काम मिळाल्याचे कामगारांना कळताच कामगारांनी दिनांक 22 मे 2024 रोजी कंपनीला सास्ती येथे स्थलांतरीत करून घेण्यासाठी निवेदन दिले, 24 मे पर्यंत कामावर घ्या अन्यथा कंपनी विरोधात धरणे आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला होता. त्यानुसार कामगारांनी कंपनी विरोधात धरणे आंदोलन केले. आंदोलना दरम्यान राजुरा पोलिसांनी कामगारांना नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी 30 कामगारांना ताब्यात घेतले.

सीएमपीएल माती उत्तखन कंपनी चे साखरी पवनी वेकोली परिसरातील माती उतखननाचे कार्य संपूष्ठात आल्याने येथे कामावर असणाऱ्या सर्व स्थानिक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले यावरून कामगारांवर आणी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली, परिणामी कंपनीला सास्ती वेकोली येथे परत माती उतखननाचे काम मिळाल्याने स्थानिक पवनी, साखरी, गोवरी येथील कामगारांना सास्ती येथे स्थलांतरित करीत पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी कंपनी परिसरात कामगारांनी धरणे आंदोलन केले.

नौकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, स्थानिकांना रोजगार द्या, अश्या कंपनी विरोधात घोषणा देत कामगारांनी सीएम पी एल कंपनी आवारात दिनांक 25 मे 2024 रोजी दुपारी 12 आंदोलन सुरु केले. आंदोलना दरम्यान राजुरा पोलिसांनी 29 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

यावेळी आंदोलनकर्ते अनैशा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष सूरज उपरे, वोल्वो ऑपरेटर आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, संकेत भादीकर, आशिष पाझारे, प्रशांत वाघे, सुधाकर बोबडे, दशरथ कोंडावार, पांडू मंगाम, अविनाश मंचलवार, नरेश येल्लारी, श्रीकांत जेल्लोलवार, साई मिगीलवार, राम ईरकुलवार, दयानंद चव्हाण, विठ्ठल कोल्हे, प्रवीण चेनवेनवार, गणेश चीप्पावार, प्रकाश मंगाम, संजू मारमोकमवार, सागर ईसमपल्लीवार, शंकर काळे, राम वरदलवार, संतोष राजनवार, भीमा राजू अद्दुरी, हरीश रैनावेणी, पिंटू चेनवेनवार, राकेश चेनवेनवार, प्रकाश चेनवेनवार, अजय ईग्रपवार, राहुल राठोड, गणेश बोबडे तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे, सुभाष हजारे आदी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सदर आंदोलनाची दखल जिल्हा व तालुका प्रशासनाने घेऊन स्थानिक कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन कामगारांचा व त्यांच्या कुटुंबावर निर्माण झालेली उपासमारीची पाळी हटविणार काय? याकडे कामगार व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here