चंद्रपूर जिल्हा मस्त्य व्यवसाय सह. संघ. मर्या. चंद्रपूर यांच्या प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा
चंद्रपूर : महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर जिल्हा मस्त्य व्यवसाय सह.संघ. मर्या. चंद्रपूर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकशाहीचा रक्षणासाठी,ओबीसी, भटक्या-विमुक्त यांच्या पारंपारिक हक्काच्या रक्षणासाठी, सहकार क्षेत्र तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोग, निवृत्त न्यायाधीश तथा संचालक महाराष्ट्र मच्छीमार संघाचे चंद्रपाल मेश्राम यांनी धानोरकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या पाठिंब्यामुळे प्रतिभा धानोरकर यांची ताकद वाढली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.