विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे विश्वरत्न पुजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात आदरांजली वाहीली
चंद्रपूर (दिनांक १४ एप्रिल, २०२४)
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे, या पवित्रदिनी माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यासह गांधी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला मालार्पण करूण अभिवादन व आदरांजली वाहिली तसेच सोबतच्या सर्वांनी मालार्पण तथा पुष्पार्पण करुण आदरांजली वाहिली.
आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती प्रित्यर्थ संपूर्ण भारतवासी या महामानवाला कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहत आहेत. देशातील काही नेते देशाला काही देऊन जातात. डॉ. बाबासाहेबांनी देशाला अनमोल असे संविधान दिले. या संविधानामुळेच ७५ वर्षानंतर सुध्दा भारत देशातील लोकतंत्र सुचारु पध्दतीने चालू आहे. लोकतंत्राला माननारे संविधान बदलण्याचा विचार ही मनात आणू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील गोरगरीब, दलित, वंचितांच्या जीवनाच्या उध्दारासाठी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच संविधाना सोबतच ग्रामस्तरापासून तर देशस्तरापर्यंत संविधनाच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबविण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेबांनी दिली, ते आदर्श व प्रेरणा आपण आपल्या हृदयात कायमची जोपासली पाहिजे.
या आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक श्री अशोक नागापूरे, शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री देवेंद्र बेले, कामगार प्रमुख चंद्रशेखर पोडे, स्वप्नील तिवारी, पंकज गुप्ता, माजी नगरसेवक महेंद्र जयस्वाल, श्रीनीवास पारनंदी, विनोद पिंपळशेंडे, सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, श्रीमती सायरा बानो, कामगार नेते विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, सुदर्शन पुल्ली, महेश वाटेकर, कृष्णा यादव, सुनिल बकाली, सुनिल बावणे, विनोद महतो, मुर्लीधर चौधरी, सचिन गावंडे, शंकर बल्लेपवार, पृथ्वी जंगम, भारत जंगम, जमीलभाई, कमलाकर उरकुडे, अनुप संधू, हरीश वासेकर उपस्थित होते.