सरांडी येथे क्रांतिसूर्य वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची जयंती साजरी
जय गोंडवाना युवा जंगोम दल सरांडी व ग्रामस्थ च्या वतीने क्रांतिसूर्य वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त गावातून रॅली काढण्यात आली.
सर्व प्रथम विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके, शहीद बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. उपस्थित पाहुणे मंडळीचे स्वागत पुष्पगुछ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोटनाके सामाजिक कार्यकर्ते राजुरा, प्रमुख अतिथी विनोद जगताप सरपंच ग्रा. पं. लाठी, साईनाथ कोडापे उपसरपंच ग्रा. पं. लाठी, राजकुमार चिंचोलकर मुख्याध्यापक जि.प. शाळा सरांडी, गजाननजी कवालकर, गजानन जगताप, शंकर निकोडे, योगपतीराज मट्ठे, महानंदाताई कवालकर सदस्या ग्रा. पं. लाठी, दिनेश कोटनाके, मारोती आत्राम, देवाजी कोटनाके, अंकिता सुरेश मडावी, भूमिका मडावी, सत्कारमूर्ती वारलू मेश्राम यांना आदिवासी समाज व ग्रामस्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यांनी आपले शालेय जीवनातील आलेले शैक्षणिक अनुभव व त्या काळात वाहने नसताना शिक्षण घेताना काय अडचणी आल्या कसा मार्ग काढत अभियंता पर्यंतचा प्रवास केला याबाबत अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोटनाके यांनी सरांडी येथील आपल्या स्वगावातील बालपणातील आलेले अनुभव व आज पर्यंतचा सामाजिक प्रवास वर्णन भाषणातून व्यक्त केला. इतर मान्यवरांची क्रांतिसूर्य विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जीवनावर भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव कोटनाके, संचालन कु. प्रणाली सुखदेव कोटनाके व आभार सूरज कोटनाके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उर्मिला सिडाम, शोभा मडावी, विश्वास कोटनाके, उषा मट्ठे, मनीषा मट्ठे, पौर्णिमा जगताप, संगीता जगताप, भिमराव चांदेकर, भिमराव ताकसांडे, रोहित घोडाम, साईनाथ टेकाम, रामचंद्र मट्ठे, विनोद मट्ठे, नंदकिशोर मट्ठे, केशव सिडाम, राजु सिडाम इत्यादी सरांडी बांधव व महिला यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.