चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून इंडिया आघाडी प्रणित कॉंग्रेसकडून भाजपाच्या ईशा-यावर कमजोर उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्यास आम आदमी पार्टी आपला उमेदवार उभा करेल असा ईशारा आम आदमी पार्टीचे नेते सुनिल मुसळे यांचा इशारा
चंद्रपूर :- संविधान विरोधी भाजपाला सत्तेपासून दूर करण्याकरीता आम आदमी पार्टी इंडिया आघाडीत सहभागी झाली आहे. मात्र कॉंग्रेसकडून राजकारणाचा अनुभव नसलेल्यांना लोकसभा उमेदवारी देत असेल तर, आम आदमी पार्टी याचा विरोध करेल आणि ईतर घटक पक्षांना सोबत घेऊन चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी दाखल करेल असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवाणी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मागीतली आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते असले तरी, भाजपाच्या विरोधात मिळमिळीत भूमिका घेत असल्यांचे दोनही अधिवेशनातून स्पष्ट झाले आहे. भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात सहभागी होत असल्याचे जाहीररित्या सांगीतले आहे. विजय वडेट्टीवार यांनी याचा अजूनपर्यंत इंकार केला नाही. विजय वडेट्टीवार हे भाजपात प्रवेश करण्यांच्या अनेकदा चर्चा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या प्रेमात असलेल्या विजय वडेट्टीवारांच्या मुलीला कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यास, भविष्यात कॉंग्रेसला व इंडिया आघाडीला निश्चितच धोका निर्माण होवू शकतो.
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात सध्या मोदी विरोधात लाट आहे, इंडिया आघाडीला चांगली संधी आहे. अशा परिस्थितीत भाजपाला लाभ व्हावा यासाठी शिवाणी वडेट्टीवार सारख्या कमजोर उमेदवारांस कॉंग्रेसने निवडणूकीत उभे केल्यास, आम आदमी पार्टी याचा ताकदीने विरोध करेल असेही मुसळे यांनी म्हटले आहे.
या अगोदर आम आदमी पार्टीने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती त्यात दोन लाखा पेक्षा अधिकची मते आम आदमी पक्षाला मिळाली होती. आम आदमी पार्टी चा झाडू हा घराघरात पोहोचला आहे. काँग्रेसने वेळीच सावध होऊन जिंकणारा उमेदवार द्यावा व भाजपाला छुपा पाठिंबा देने बंद करावे असेही प्रसिद्धी पत्रकात सुनील मुसळे यांनी म्हटले आहे.