राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात

0
483

राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात

पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद!

राजुरा | दि.०६ मार्च : मा. ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाचे काल (दि. ०५ मार्च) सौ. अर्चना भोंगळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटनानंतर महिलांच्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दिवसभरात विविध क्रिडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये लिंबूचमच स्पर्धेत सौ. मंगला देरकर यांनी प्रथम, सौ. सपना शेंडे यांनी द्वितीय तर सौ. उषा उपरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर घेतलेल्या संगितखुर्ची स्पर्धेत सौ. सोनल चिडे प्रथम, सौ. अर्चना मंगरूळकर द्वितीय तर गुरूचरण कौर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पाठोपाठ अत्यंत चुरशीच्या लढतीत पार पडलेल्या रस्सीखेच स्पर्धेत झाशी राणी ग्रुपने प्रथम, माँ दुर्गा ग्रुपने द्वितीय तर डायनॅमिक ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच बोरारेस स्पर्धेत सौ. रजनी बोढे यांनी प्रथम, जानवी विरूटकर यांनी द्वितीय तर नेहा नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविले.
वर्षभर चुलं-मुलं आणि घरकाम, नोकरी व व्यवसाय सांभाळत असणाऱ्या महिलाभगीनींनी उसंत काढून एकत्र येता यावं, आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांना मंच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवास स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, मंजुषा अनमुलवार शितल वाटेकर, सिमा देशकर, ममता केशट्टीवार, शुभांगी रागीट, योगीता भोयर, राणी नळे, दिपा बोंथला, सुनैना तांबेकर, लक्ष्मी बिस्वास, रेश्मा तोटावार, राधा विरमलवार, गौरी सोनेकर आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिक महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here