कोरोना जनजागृती काव्यधारा – ५

0
792

कोरोना जनजागृती काव्यधारा – ५

कवी – संतोषकुमार उईके, गोंडपिपरी

 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

 

समजू नका तुम्ही कोरोनाच्या विषाणूला लहान..
त्याच्या पुढे सारे गुडघे टेकले, जे होते थोर महान..

माज उतरला मोठ्या मोठ्यांचा, ज्यांना होता भारी गर्व
यंत्र थांबले, उद्योग थांबले, थांबले जागच्या जागी सर्व
स्वैराचाराला आळा बसला, गेले बदलून जीवनमान…

परदेशातून देशात आला अन् पसरला शहराशहरात
गावेही आली विळख्यात त्याच्या शिरला घराघरात
धडपड चालली जगण्याची, ती लपवूनी खोटी शान…

मास्क लावुया तोंडाला अन् सॅनिटायझर हाताला लावू
गर्दी टाळण्यासाठी हो दोघात दोन हाताचा अंतर ठेवू
येता बाहेरूनी धुवायचे हातपाय, याचे राखू या रे भान…

घेऊ तपासून तापमान शरीराचे, करू ऑक्सिजनचे मोजमाप
सांगून टाकू असता लक्षणे, अंगदुखी, सर्दी, खोकला अन् ताप
बाधा टाळण्या कोरोनाची, थांबवू संसर्गाचे दान…

शासनाचे ते नियम पाळूनी पूर्ण करूया जिम्मेदारी
समजुनी घेऊ योजनेला ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
कुटुंबच आपली खरी प्रेरणा, चला वाचवूया एकाएकाचे प्राण…

कवी : संतोषकुमार विजयराव उईके,
गोंडपिपरी, जि.चंद्रपूर
संपर्क. ९३५९२३७२२५

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here