उद्या सिध्देश्वर मंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

0
423

उद्या सिध्देश्वर मंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

राजुरा : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या इ. स. १३०० ते १४०० मधील प्रसिद्ध सिद्देश्वर येथील महादेवाच्या यादवकालीन पुरातन हेमाडपंथी श्री सिद्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १४.९३ कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यांचा भूमिपूजन सोहळा आज (दिनांक ८) पालमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होत आहे.

सिद्धेश्वर येथील महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असून एक मुख्य मंदिर व बारा वेगवेगळे ज्योतिर्लिंग मंदिर आहे. प्रत्येक मंदिरात शिवलिंग आहे. मोगल काळात या मंदिराची नासधूस केल्याचे बोलले जात असून यात मंदिरावरील संपूर्ण शिखरे उद्ध्वस्त केली आहे. मागील अनेक वर्षांपासून या पुरातत्व मंदिराची भग्नावस्था झाली आहे. इतरत्र शिलालेख पसरलेले असून मंदिराचा परकोट उद्ध्वस्त झाला आहे. सभोवती जंगलाचा परिसर असल्याने व संरक्षण भींत नसल्यामुळे नेहमी मंदिर परिसरात हिंस्त्र पशुंच्या वावर असतो. या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा व विश्वास असल्याने या मंदिरात श्रावण महिन्यात व शिवरात्रीला उत्सव साजरा केला जात असून, मंदिरात महाराष्ट्रातील तसेच नजीकच्या तेलंगणातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या परिसरात यादवकालीन, पेशवेकालीन व गोंडकालीन अवशेष असून, या ठिकाणी प्राचीन संस्कृती दडलेली आहे.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य मनमोहक येथील हेमाडपंथी श्री सिद्देश्वर मंदिराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचे पुनर्निर्माण करणे, ध्यानसाधना केंद्राची निर्मिती करणे, भक्तनिवास, भव्य प्रवेशद्वार, संपूर्ण परिसराला परकोट, सौंदर्याकरण, सुशोभीकरण, मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी संत स्वामी चैतन्य महाराज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, देवाडा सरपंच शंकर मडावी, सोंडोचे सरपंच जयपाल मडावी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान श्री सिध्देश्वर शिवालय देवस्थान कमिटी सोंडोनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here