अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड कडून शोकसभागृह नगरपरिषदेला हस्तांतरण
गडचांदूर: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाच्या विकासा करिता चारही बाजूने विचार करीत असते. त्याकरिता आजूबाजूच्या गावांमध्ये विकास कामे आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमाद्वारे राबवत आहे. यावेळी गडचांदूर शहरातील नागरिकांचा विचार करीत त्यांनी गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे 114 चौ. मी. लांबीचे शोकसभागृह, महिला व पुरुष प्रसाधान गृह आणि प्रवेशद्वार यांचे बांधकाम करून त्याचे नगरपरिषद गडचांदूर ला नागरिकांच्या सेवेसाठी हस्तांतरण करण्यात आले. अंतविधी नंतर शोकसभा घेतली जाते. त्यावेळेस ऊन, पाऊस आणि वारा या पासून अंतविधीला उपस्थित नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रसाधनाची व्यवस्था असावी हा त्या बांधकामा मागचा उद्देश आहे. या बांधकामामुळे अंत्यविधीला आलेल्या नागरिकांचा त्रास कमी होणार यामुळे नगरपरिषद गडचांदूर प्रशासनाने आभार मानले.