चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

0
476

चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार

 

चंद्रपूर, 11 जाने. : चंद्रपूर जिल्हा न्यायालयात झालेल्या मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार दिली आहे.

तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, दोन अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सचे काम करण्यात आले. हे काम करोडो रुपयांचे आहे. या कामात बिल्डिंग मेंटेनन्स, टाइल्स लावणे, कलर करणे यासोबत अनेक कामे करण्यात आली होती. मात्र, या दोन वर्षातच या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, संपूर्ण लावण्यात आलेले टाइल्स अनेक ठिकाणावरून निघून खाली पडले आहेत. अनेक ठिकाणच्या टाइल्स निघण्याच्या तयारीत आहेत. टाइल्सच्या आत मध्ये मटेरियल लोकल क्वालिटीचे वापरल्यामुळे ही टाइल्स भिंतीला चिपकवण्यात आलेली नाहीत. तसेच, भिंतीचा कलर कामात सुद्धा लोकल कॉलिटी चे पेंट मारले असल्यामुळे ते पेंट सुद्धा भिंतीवरून उघडत चाललेले आहे.

राईकवार यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here