नांदा फाटा परिसरातील अवैध रेती तस्करावर तहसीलदार आळा घालतील काय..?
अवैध रेती व्यवसायिक देत आहे पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी
अवैध रेती व्यवसाय राजरोसपणे सुरू
नांदा फाटा :- नांदा फाटा परिसरात अवैध रेती मोठ्या प्रमाणावर राज रोस पने सुरू आहे. अवैध रेती व्यावसायिक यांच्याशी स्थानिक महसूल अधिकारी यांचे हितसंबंध असल्याने कारवाई तर दुरच पण त्यांच्या अवैध रेती साठ्याची साधी पाहणी सुध्दा करताना दिसून येत नसल्याने आता तहसीलदार साहेब तरी आळा घालतील काय याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.
नांदा फाटा परिसर औद्योगिकीकरणामुळे भर-भराटीस आले आहे. त्यामुळे येथे अवैध रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. दररोज येथील अवैध व्यावसायिक बाहेरून रात्रीला विना टी.पी. (हायवा) ट्रक भर रेती बोलावून दिवसा त्याची विल्हेवाट लावल्या जात आहे. तसेच परिसरातील नाल्यातून अवैध उत्खनन करून काळी रेती ची दिवसा वाहतूक केली जात आहे. हा त्यांचा गोरखधंदा खुलेआम रोजचा झाला असून स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी हे मात्र युतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अवैध रेती वाहतुकीत विना नंबर प्लेट व कृषी विभागाने दिलेल्या ट्रॅक्टर चा वापर होत आहे.
नांदा फाटा येथील अवैध रेती व्यवसायिक यांच्या बातम्या प्रकाशित झाल्या मात्र तरी देखील तलाठी व मंडळ अधिकारी यांना घाम फुटल्याचे दिसून येत नाही. याउलट रोजच अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर पांढर पेशी नेत्यांकडून फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर अवैध रेती व्यवसायिक बैठक घेऊन चर्चा करीत असून “काय काशी ला नेणार, एक एकाला पाहून घेऊ” या भाषेत बरडत सुटले असून मारण्याची धमकी सुध्दा देत आहे. नुकतेच गडचांदूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी यांना मारल्याची बातमी ताजी आहे. यामुळे पोलीस प्रशासन सुध्दा अशा घटनेवर बरिक लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे.
अवैध रेती तस्करावर आळा घाला या करीता तहसीलदार यांच्याकडे तक्रार झाल्याची समजते. महसूल अधिकारी यांच्या भरवशावर मुजोर झालेल्या अवैध व्यवसायिक यांच्या वर तहसीलदार साहेब कारवाई करतील काय.? याकडे मात्र पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे.