पाईप कन्व्हेअर बेल्ट मधील प्रकल्पग्रस्त कामगारांवर CSTPS कडून होणाऱ्या अन्यायाविरोधात बेमुदत साखळी उपोषण
सविस्तर वृत्त असे की, CSTPS चंद्रपूर येथील पाईप कन्व्हेअर बेल्ट च्या स्थापनेपासूनच या कामाचा कंत्राट हा थायसन क्रूप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाला परंतु या कंपनीने पेटी कंत्राट मध्ये भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट दिला असून ही कंपनी नियमितपणे कामगारांना २६ दिवस काम देण्याऐवजी फक्त प्रकल्पग्रस्त कामगारांना १५ दिवसांचे काम देत आहे. हा प्रकल्पग्रस्त कामगारांवर अन्याय असून कामगारांना नियमितपणे २६ दिवस काम मिळावे या कायदेशीर रास्त मागणी करिता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी दिनांक:- २७/११/२०२३ रोजी समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांच्या नाव व स्वाक्षरी च्या यादीसहित CSTPS प्रशासन तथा चंद्रपूरचे मा. पालकमंत्री महोदय आणि संबंधित शासकीय कार्यालयामध्ये निवेदन दिले होते. यानंतर दि. ०४/१२/२०२३ रोजी मा. पालकमंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक श्री. संतोष अतकरे आणि श्री. रामपाल सिंग व कामगार यांच्या समक्ष CSTPS चे मा. मुख्य अभियंता साहेब यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये सदर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. तरी देखील CSTPS प्रशासनाने सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्या कारणाने अखेर दिनांक- ०९/१२/२०२३ रोजी मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना तथा CSTPS प्रशासनासह इतर संबंधित विभागांमध्ये निवेदन देण्यात आले होते.
व दिलेल्या निवेदनामध्ये समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांना नियमितपणे २६ दिवस काम न मिळाल्यास एक आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर दिनांक- २०/१२/२०२३ रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला असताना देखील सदर कामगारांना तात्काळ न्याय मिळावा याकरिता संबंधित प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली न झाल्याने सदर गंभीर समस्येकडे संपूर्णतः प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तथा उपोषणाच्या एक दिवसाआधी दिनांक- १९/१२/२०२३ रोजी वेळ दु. ३:०० वा CSTPS प्रशासनाने आपल्या पत्रासोबत भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे जोडलेले पाठवलेल्या पत्रामध्ये मागणी पूर्ण करण्याऐवजी बेकायदेशीर उडवा उडवी चे उत्तर देत खोटी माहिती दिल्या कारणाने अखेर कंटाळून समस्त प्रकल्पग्रस्त कामगार दिनांक- २०/१२/२०२३ आज पासून खालील मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केलेली आहे.
उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर आज दिनांक- २०/१२/२०२३ रोजी CSTPS प्रशासनाने कामगारांची बैठक लावली या बैठकीमध्ये उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण करण्याऐवजी उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना विनंती केली. परंतु श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे या वेळेस अधिकाऱ्यांना सांगत उपोषण सुरूच ठेवले.
CSTPS प्रशासनाच्या वेळोवेळी झालेल्या दुर्लक्षामुळे नाईलाजास्तव अखेर लोकशाहीचा मार्ग पत्करत वेळोवेळी कामगारांना उपोषण अथवा आंदोलन करूनचं आपल्या कायदेशीर रास्त मागण्या पूर्ण कराव्या लागतात ही फार शोकांतिका आहे.
CSTPS प्रशासनाच्या विरोधामध्ये कामगारांचे वर्षातून ४-५ आंदोलने व ४-५ उपोषणे हे सुरूच असतात कुठेतरी CSTPS प्रशासनाने याचे आत्मपरीक्षण करणेहे निश्चितच आवश्यक आहे. अशी भावना यावेळेस श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केली असून प्रकल्पग्रस्त कामगारांना उपोषण करू नये जर न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळेस CSTPS प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी दिला.