महापरिनिर्वाण दिनानिमित्त ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून वाहिली आदरांजली
राजुरा, ६ डिसें. : सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारा सामाजिक कार्यकर्ता अमोल राऊत यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रक्तानुबंध जोपासत समाजाला खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी ज्ञानाच्या अथांग महासागरास ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
अमोल राऊत व त्यांचे सर्व सहकारी नागवंश युथ फोर्स राजुरा हे वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवा भावाने करतात. आज परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
सर्व रक्तदात्यांनी बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे आयोजित शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले.
नागवंश युथ फोर्स राजुराचे डॉ. संदीप बांबोळे, अमोल राऊत, सुरेंद्र फुसाटे, रवी झाडे, राहुल अंबादे, रविकिरण बावणे, धनराज उमरे, नितीन कांबळे, गणेश देवगडे, अमोल जगताप, निखिल वनकर, युवराज कातकर, अभिजित बोंडे, अनिकेत साळवे, संयोग साळवे, विनय रामटेके या सर्वांचे अनमोल असे योगदान लाभले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संकलन अधिकारी डॉ. सिमरन खान, पी.आर.ओ. सतीश तकडलावार, निलेश सोनवणे, बी.बी.एस.ओ. स्वप्नील चापले, बी.बी.एस.ओ. कु. मोहिनी चुटे, सहाय्यक प्रमोद देशमुख, वाहन चालक बंडू कुंभारे, उप टेक्निशियन मेघा राऊत यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.