सुप्रसिद्ध youtuber प्रशिल अंबादे यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकवला तिरंगा

0
539

सुप्रसिद्ध youtuber प्रशिल अंबादे यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प वर फडकवला तिरंगा

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध youtuber प्रशिल जयदेव अंबादे यांनी 13 दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाल मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्प वर तिरंगा फडकवला. या मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्य महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता.

youtuber प्रशिल अंबादे यांनी या मोहिमे अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट च्या बेस कॅम्प ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 17,598 फूट आहे,या जागेवर पोहोचून तिरंगा फडकवला. प्रशिलने सांगितले की तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन,लांबवर पसरलेले रस्तेअन उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले.

प्रशिलने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचून लोकांना पृथ्वीवर वाढत्या तापमानाकारण ग्लेशर वितळून होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती दिली.लोकांना स्वच्छतेचा संदेश तसेच जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी विनंती केली, जेणेकरून येणाऱ्या काळात वाढत्या तापमानाकरण वितळणाऱ्या ग्लेशरला आपण वाचवू शकू.

या मोहिमेदरम्यान youtuber प्रशिल अंबादे यांनी वृक्षतोडीकरण जागतिक तापमान वाढ होऊन पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here