दादर फुल मार्केट येथे विषारी खत प्रकल्प हटवण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांचा विरोध व आंदोलन

0
523

दादर फुल मार्केट येथे विषारी खत प्रकल्प हटवण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांचा विरोध व आंदोलन


मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
मुंबई, दादर फुल मार्केट येथे विषारी खत प्रकल्प हटवण्यासाठी सर्व रहिवाश्यांचा आवाज आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेपर्यंत आणि सर्व नेते मंडळी पर्यंत पोहोचवण्यासाठी शांतपणे आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून सदरच्या खत प्रकल्पातून कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या विषारी धुराने स्थानिक रहिवासी त्रस्त होते. अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार करू नये तसेच मार्केटच्या इन्स्पेक्टरला तोंडी निवेदन करूनही कोणती कारवाई होत नव्हती त्यामुळे सर्व रहिवाशी रस्त्यावर उतरून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आंदोलन दरम्यान स्थानिक आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांनी भेट देऊन आश्वासन दिले की पुढील आठवड्यात पालकमंत्री श्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याचे आदेश करण्यासाठी निवेदन करणार असे सांगितले. प्रकल्पातून निघत असलेल्या धुरामुळे अनेक लोक खोकला व इतर आजारांच्या विळख्यात आपले जीवन जगत आहेत. आसपासच्या सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे कॅन्सरवर, क्षय रोगाचे पेशंट सध्या जास्त प्रमाणात आढळून आले आहे. खत प्रकल्पात फुलेच नाही तर इतर कचरा प्लास्टिक असे नानाविध प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी जाळून खत बनवला जातो. खत प्रकल्प रद्द झाले नाही तर परिवारासहित रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा ईशारा देण्यात आले आहे. ह्यात आमदार श्री कालिदास कोळंबकर, श्री दिपक दळवी सेक्रेटरी-स्वराज्य संस्था, श्री प्रमोद सावंत सेक्रेटरी-श्रम साफल्य मंडळ, श्री जितेंद्र कांबळे- उपाध्यक्ष विधानसभा, श्री दिनेश पुंडे मार्केट व्यापारी व ईतर स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here