राळेगांवच्या रक्षा नगराळेला राज्य स्तरीय आदर्श साहित्य सेवक भाषा गाैरव पुरस्कार बहाल!
मुंबईत पार पडला शानदार पुरस्कार साेहळा!
मेघाताई धाेटे ,मायाताई काेसरे , प्रभा अगडे यांचेसह अनेकांनी केले रक्षाचे काैतुक!
किरण घाटे
राळेगांव (यवतमाळ) । राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020चा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत थाटात पार पडला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयाेजन करण्यांत आले हाेते. राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 101 पुरस्कार कर्त्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले .उपराेक्त (या )पुरस्काराची मानकरी महाराष्ट्रातील लाेकप्रिय सहज सुचलची नामवंत सदस्या तथा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव निवासी कु.रक्षा नगराळे ही ठरली !
राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव 2020चा पुरस्कार मिळाल्याबद्दल तीचे सहज सुचलच्या संयाेजिका मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे ,कविता चाफले , जास्मिन शेख ,ज्योति मेहरकुरे पूनम रामटेके ,प्रतीक्षा झाडे , प्रांजली दुधे, सरीना काेटनाके यांचे सह साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळीनी गाेड कौतुक केले आहे .सुपरिचीत राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ .प .केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तत्वचिंतक ह .भ. प .श्यामसुंदर महाराज सोन्नर,ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, प्रख्यात आदर्श शिक्षिका मनिषा कदम घार्गे प्राचार्या श्रीमती रोशनी शिंदे, प्राचार्या श्रीमती कल्पिता पर्शराम, प्राचार्या प्रगती साळवेकर, सामाजिक नेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच कर्तव्यदक्ष आयकर अधिकारी अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष अतिथी म्हणून आपली उपस्थिती नोंदविली.
व्यासपीठावर शिवयोगी मीराताई आणि प्रगतीशील शेतकरी व उद्योजक पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते. उपराेक्त राज्यस्तरीय समारंभाचे अतिशय उत्तम असे व्यवस्थापन राजेंद्रदादा सरोदे यांनी बघितले या ऑनलाईन समारंभाचे सुत्रसंचालन गुणीजन परिवाराचे संस्थापक तथा अध्यक्ष अधिवक्ता कृष्णाजी जगदाळे यांनी केले. सदरहु शानदार सोहळ्याची सांगता महिलांच्या राष्ट्रवंदन गीताने झाली.