राजुऱ्यात चिमुकल्यांच्या आनंदात रमले “देव”राव
बाल गोपालाना भेटवस्तू देत दिल्या शुभेच्छा
राजुरा : तान्हा पोळा हा बैल पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सन आहे. बैल पोळ्याईतकेच तान्हा पोळ्याला महत्त्व आहे. दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा सुरु आहे. लहान चिमुकल्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सन आहे. राजुरा शहरातील विविध ठिकाणी तान्हा पोळा भरविण्यात आला. यावेळी “देव”राव भोंगळे लहान चिमुकल्यांच्या आनंदात रमुन गेले. यावेळी चिमुकल्यांना देवराव भोंगळे यांनी भेट वस्तू देत शुभेच्छा दिल्या.
आजच्या दिवशी लहान मुले लाकडापासुन तयार केलेल्या नंदि बैलांची मिरवणूक काढली जाते. त्यासाठी लाकडापासुन तयार करण्यात आलेले नंदी बैल घेऊन चिमुकले एकत्र होतात. रंगरंगोटी करुण सजविलेले लाकडी नंदीबैल, यात कुणी बैलासह लावलेल्या सामाजिक संदेश, सजवलेले नंदी बैल, अन् नटलेले चिमुकले, खाऊची धमाल, बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासुन महापुरुषांची वेशभुषा यामुळे मुलांचे कौतुक होऊन बक्षीस दीले जाते. यानिमित्ताने देवस्थान समिती, वेगवेगळ्या संघटना तान्हा पोळा नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करीत असते.
राजुरा शहरात श्री हनुमान मंदिर देवस्थान जुना बस स्टँड, रामनगर कॉलनी, जवाहर नगर, कर्नल चौक, चुनाभट्टी वॉर्ड, इंदिरा नगर, सोमेश्वर मंदिर सह विविध ठिकाणी लहान मुलांनी सजविलेल्या लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा मोठ्या प्रमाणात भरण्यात आला. लहान मुलानी वेषभुषन परिधान करून पोळा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांना सुधीरभाऊ सेवा केंद्र व राजुरा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देवराव भोंगळे यांनी लहान बालकांना भेट वस्तू देत शुभेच्छा दिल्या. यावेळी विनायक देशमुख, महेश रेगुंडावार, संजय उपग्नालावार, सुरेश रागीट, सोमेश्वर आईटलावर, मिलिंद देशकर, सचिनसिंह बैस, विनोद नरेन्दुलवार, सिनू पांजा, नितिन वासाडे, आदी धोटे, सचिन भोयर, मोहन कलेगुरवार, प्रमोद पानघाटे आदींसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.