आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा (ख.) ता. नागभीड येथे साजरा झाला ‘स्वयंशासन उपक्रम’

0
528

आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा (ख.) ता. नागभीड येथे साजरा झाला ‘स्वयंशासन उपक्रम’

भविष्यात ‘गुरुजी’ होण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच प्रत्यक्षात गुरुजी होण्याच्या अनुभव घेतला.
आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा (ख.) ता. नागभीड जि. चंद्रपूर येथे ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यालयात विदया्यार्थ्यांनी स्वयंशासन राबविले. यात शिक्षक, शिपाई लिपिक पासून तर मुख्याध्यापकाची जबाबदारी सुद्धा विदयार्थ्यांनीच उत्तम प्रकारे सांभाळली सुमीत मंगाम याने मुख्याध्यापक म्हणून आपले प्रशासकिय कौशल्य दाखवून दिले. यात व्याख्यानासारखी बाब म्हणजे यात असलेला अधिका धिक मुलींचा सहभाग होय

कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजू यशवंत कोरे सर यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. आपण पूढे भविष्यात चांगले शिक्षक होण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे असे आवाहन अध्यक्षपदावरुन मुख्याध्यापकांनी केले कार्यक्रमाला शिक्षक कु. संगिता गोहणे मॅडम, मनीष कोहाडे सर, संजय गडपायले सर, अजय परशुरामकर सर, शिवानी कुथे मॅडम, मयुर मेश्राम सर, लोमेश मडावी सर, यांचे समयोचित मार्गदर्शन लाभले सौ. रेखा जगनाडे, मॅडम, विजय पारधी सर,श्रीमती भांडारकर मॅडम, यांनी उच्च माध्यमिक विभाग सांभाडला कार्यक्रमाचे संचालन कु. अंकिता कोरे तर आभार गौतम बारसागडे याने केले आसिफ बागडे व मुकेश बागडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here