विठ्ठल मंदिर येथील आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची तपासणी
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकारातून आरोग्य शिबिराचे आयोजन
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकारातून विठ्ठल मंदिर वार्ड येथे आयोजित आरोग्य शिबिराचा अठ्ठराशे नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी सर्व रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर निशुल्क औषधोपचार करण्यात आले. तर अतिगंभिर रुग्णांना पूढील उपचार व शस्त्रक्रिये करिता सांवगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, मनपा उपायुक्त अशोक गराडे, एम. ओ डाॅ. योगेश्वरी गाडगे, शुभांकर पिदुरकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान, विमल कातकर, आशु फुलझेले, स्मिता वैद्य, अनिता झाडे, वैशाली रामटेके, कविता निखाडे, वैशाली मेश्राम, माधूरी निवलकर, नंदा पंधरे, अॅड. राम मेंढे अॅड. परमहंस यादव आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध भागात चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन केल्या जात आहे. तुकुम, बाबूपेठ, महाकाली काॅलरी यानंतर विठ्ठल मंदिर वार्ड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तपासणीसाठी जवळपास अठ्ठराशे नागरिकांनी नोंदणी केली होती. सदर शिबिरात या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात ब्लड प्रेशर, ई.सी.जी, मँमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, मोफत औषधी व तपासणी, बाह्यरुग्ण सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, सिकल सेल चाचणी आदी तपासण्या करुन औषधोपचार करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य शिबिराला भेट देत नागरिकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी तपासणीसाठी येथे येणा-या नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्यात. तपासणी दरम्याण गंभिर आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून आलेत त्यांना पूढील उपचारासाठी सावंगी मेघे रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आले. तसेच सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.