कोरपणा येथील राजकीय रेती मुरूम तस्करांवर गुन्हे दाखल

0
1082

कोरपणा येथील राजकीय रेती मुरूम तस्करांवर गुन्हे दाखल

कोरपणा
कोरपणा येथे राजकीय पुढारी म्हणून वावरत असलेले कोरपना येथील पदाधिकारी महसूल विभागाच्या आशीर्वादाने नदी घाटावरून तस्करी मध्ये थैमान घातले तर गावालगतच असलेल्या नाल्या मधील दगड, रेती राजरोसपणे उत्खनन करून कोरपणा शहरासह कोरपणा परिसरात सर्रास व्यवसाय करीत आहे. महसूल विभागाकडे अनेक तक्रारी करून सुद्धा महसूल विभाग खडबडून जागा होत नाही. महसूल विभागाची मुक सहमती असल्याने चोर चोर मावस भाऊ सत्तेचा फायदा घेऊन शासनाच्या स्वमत्वधनाला चुना लावल्या जात आहे. कोरपणा येथे दि. 03/07/23 ला रात्री 1:30 च्या सुमारास नाल्यावरून जेसीबीने उत्खनन करून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर एका मागे एक भरून घेत असताना कोरपना एक्सप्रेसचे संपादक मोहब्बत खान यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे सूचना देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोन रिसीव्ह केलंच नाही. तेव्हा येणाऱ्या वाहनाचे व्हिडिओ शूटिंग करत असताना पियुष कावरे रेती, वाळू तस्कर त्या जागी पोहोचला व तू येथे काय करतोस इथून निघून जा असे सांगत नगर नगरसेवक नितीन बावणे, नगरपंचायत कोरपणाचे उपनगराध्यक्ष इस्माईल रसूल शेख, पंकज बावणे, धीरज चेन्ने हे मोटर सायकल वर आले. व तुझा इथे का काम आहे, तू साला एवढा मोठा पत्रकार आहे का, कॉलर धरून मारून टाकण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. असे कितीतरी महसूल अधिकारी आमच्या खिशात आहे असे म्हणत व्हिडिओ काढण्यापासून अडथळा निर्माण केला. रेती तस्कर हे धमकावून अरेरावी करीत अवैध व्यवसाय करीत असतात ही घटना घडताच संपादक मोहब्बत खाली यांनी रात्री 1:30 च्या सुमारास पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेबद्दल तक्रार दाखल करून पोलिसांना आपबीती सांगितली. पोलीस स्टेशन कोरपना येथे अपराध क्रमांक. 196 भां.द.वी. कलम 143, 294, 352, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खेकाडे हे करीत आहे. घडलेल्या घटनेचा निषेध पत्रकार संघाने केलेला असून महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती तस्करांची किंमत वाढली असून सतत पत्रकारांवर हल्ले वाढत आहे असा आरोप पत्रकार संघाने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here