त्या साठ्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्याची ना ना…
अनेक दिवसापासून कृषक जागेवर साठा
महसूल विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष
नांदा फाटा – बिबि मार्गावर मागील काही वर्षंपासून अवैध, साठा केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे आणि तो साठा वाणिज्य वापरा करिता केल्या जात आहे परंतू हा गोरखधंदा अनेक दिवसा पासून सुरू असून सुध्दा महसूल अधिकारी कारवाई करण्यास पुढे धजावत नसल्याने अधिकारी यांचा कार्यशेली वर प्रश्न उपस्थित होत आहे.
बिबी गावा लागत नांदा फाटा मार्गावर काही वर्षा पासून कृषक जागेवर वैध, अवैध, रेती, मुरुम, गिट्टी, विटा, बोल्डर साठवनूक केल्या जाते. आणि तो बाजारात अवाढव्य रक्कमाने विकल्या जाते. हा गोरखधंदा मागील काही वर्षा पासून राजरोस पणे सुरू आहे.
अकृषक वापर (वानिज्य प्रयोजनाकरीता) अनाधिकृत अकृषक वापर केल्यामुळे आणी सदर वापर करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता साठा केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाते मात्र महसूल अधिकारी यांचा डोळ्या देखत वाणिज्य वापरा करिता साठा केल्या जात आहे परंतू कसल्याही प्रकारची कारवाई होत नसून नुसता टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
अकृषक जागेचा परवानगी नसतानाही हायवा व्दारे साठवनुक केल्या जात असून वाणिज्य वापर केल्या जात आहे. व ते गरजू लोकांना बे भाव विक्री केल्या जात आहे. कारवाई होत नसल्याने हा साठवनूक करून विक्रि चा गोरखधंदा फोफावल्याचे दिसून येत आहे.
तलाठी यांना सदर बाबीची माहिती देवून कोणत्या सर्वे मध्ये साठा करण्यात येत आहे याची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. किशोर उईके मंडळ अधिकारी नांदा विभाग