वंचित बहुजन आघाडी वार्ड शाखा डॉ. आंबेडकर नगर चंद्रपूर व THE HELPING HANDS (विजय फॉउंडेशन चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

0
602

वंचित बहुजन आघाडी वार्ड शाखा डॉ. आंबेडकर नगर चंद्रपूर व THE HELPING HANDS (विजय फॉउंडेशन चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न


दि.13 एप्रिल 2023 रोजी बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी वार्ड शाखा डॉ. आंबेडकर नगर चंद्रपूर व THE HELPING HANDS (विजय फॉउंडेशन चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता. यात 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रितिक ढवळे, धिरज आलम, अविनाश मेश्राम, गितेश कांबळे, जयराज दुधे, प्रशिक बडोळे, संदेश भाले, पवन निमगळे, साहिल अलोणे, सुमित निखाळे, आशिष रायपुरे, प्रशांत आक्केवार, सुनील लोहकरे, बुद्धांत उराडे, सचिन नळे, आशुतोष माहोरकर, पियुष माऊलीकर, स्वातंत्र बांबोळे, धम्मदीप दुर्गे, विपुल डोंगरे, सुमित रंगारी, प्रशांत गायकवाड, छोटू दहेकर या सर्व रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रसंगी THE HELPING HANDS (विजय फॉउंडेशन चंद्रपूर) चे संस्थापक/अध्यक्ष अजय सुनीता लहानुजी दुर्गे हे सुद्धा उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे हर्षवर्धन कांता रमेश कोठाराकर, सुदिप चहांदे, प्रतीक गणवीर, सुजीत गेडाम, बुद्धांत उराडे, हर्षवर्धन कोठारकर, प्रज्वल सुखदेव, आदित्य भावे, आशुतोष महोरकर, दिशांत गेडाम, प्रशिक बडोले, प्रमोद कोल्हे, आयुष माहोरकार, सतीश धोटे, मोहित खोब्रागडे, कबीर घोनमोडे यांच्या प्रमुख उपस्तिथीत आणि नियोजनात हा रक्तदान शिबिर कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला.

या रक्तदान शिबिराला संजीवनी ब्लड बँक यांचा सहयोग होता. चंद्रपूर जिल्ह्यात रोजघडीला जाणवणारा रक्ताचा तुटवडा, त्यातल्या त्यात रक्तासाठी गरिबांची होणारी फजिती हे चित्र बघता शहरात माणुसकीचे नाते जोपासत मोफत रक्तपुरवठा करण्यात सर्वात पुढे असणारी THE HELPING HANDS (विजय फाउंडेशन चंद्रपूर) या संस्थे मार्फत रक्तदानाचे कॅम्प वारंवार योजले जातात. उद्देश एकच असतो की गरजू गोरगरीबांना मोफत रक्त मिळावे आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी वॉर्ड शाखा डॉ. बाबासाहेब आंबेकर नगर यांचे संयुक्त विद्यमाने हा एक छोटासा मदतीचा हात बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात आला होता. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here