बांबूवर लोखंडी बीम चढवून निर्माण केलेला शेड कोसळला
सार्वजनिक बांधकाम अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : काँग्रेस
घुग्घूस : येथील तिलकनगर वस्तीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून जवळपास 56 लाख रुपयांचे निधीचा खर्च करून बगीच्यांचे निर्माण करण्यात आले
या शेडचे निर्माण अगदी विचित्र प्रमाणे केला गेला होता शेड निर्माण करतांना बाबूंचे पिल्लर निर्माण केले व त्यावर वजनाने जड लोखंडी बीम टाकून त्यावर शेड टाकण्यात आला याच मूर्खपणामुळे सदर शेड कोसळला.
सदर बगीचा 16 मार्च 2023 रोजी रात्री 09 वाजताच्या सुमारास कोसळला या दिवशी या शेड मध्ये तिलक नगर वस्तीत राहणाऱ्या कुटुंबानी लग्नाचे आयोजन केले होते.
मात्र ऐनवेळी तो लग्न याठिकानावरून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने मोठी दुर्घटना होता – होता वाचली.
हीच घटना सकाळी अथवा सांयकाळी घडली असती तर अनेक चिमुकल्याचा जीव गेला असता या संपूर्ण प्रकरणाला दोषी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता व ठेकेदारच जवाबदार असून घुग्घूस शहरात याकाळात निर्माण झालेल्या बगीच्यांचे चौकशी करून या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी
मागणी घुग्घूस काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे.
आज सांयकाळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दुर्घटनाग्रस्त बगीच्याला भेट दिली व पाहणी केली असता बगीच्यांचे भोंगळ कारभाराला घेऊन परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी दिल्या.
तिलकनगर,रामनगर येथे दुर्घटनाग्रस्त शेडच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला काँग्रेस पक्षातर्फे तक्रार करण्यात येणार असुन संबंधित अभियंता व ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला. याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, विजय माटला,शहजाद शेख,सिनू गुडला, कुमार रुद्रारप, देव भंडारी,सुनील पाटील,कपिल गोगला,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.