उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे… शिमगा चालू झाला रे!
✍🏻ज्ञानेश्वर गायकर पाटील
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या रिकाम्या जागा अन् विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. भाजपला यात मर्यादित यश मिळाले, याला यश म्हणने ही धाडस होईल. शिंदे गटांनी अद्याप एक ही निवडणूक लढवली नाही. काही ग्रामपंचायती याला अपवाद असतील, पण त्यांनी भाजपला मनोमन साथ दिली. एका बाजूने विचार केला की, जर राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असते तर भाजपचे निकाल काय असते. एक बारीक अभ्यास केला तर एक बाब लक्षात येते की, महा विकास आघाडी होती तेव्हा शिवसैनिक महा विकास आघाडी सोबत मतदान करत नव्हता, तर तो मोठ्या प्रमाणात भाजप ला चुपचाप मतदान करत होता. असे अनेक माझे जुने शिवसैनिक मित्र सांगत.
पण शिंदे प्रकरणं झालं अन् उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे गळातले ताईत बनले. शिवसेना अनैतिक मार्गाने शिंदे यांनी ताब्यात घेतल्या नंतर तर शिवसैनिकांचे तर पित्तच खवळे अन् महा विकास आघाडी मजबूत झाली. कसबापेठेतील निवडणूक याचेच द्योतक होते.
ब्राम्हण समाज हा भाजप चा पारंपरिक मतदार आहे. हा ब्राम्हण समाजावरील एक ठपका या निमत्ताने पुसला जात आहे. लोक आता राहुल गांधी अन् मोदी यांची तुलना करू लागले आहेत. ऑक्सर विद्यापीठ, ब्रिटिश संसदेतील राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे भारताची आजची “हुकूमशाही” कशी वाढत आहे याचे एक विश्लेषण होते. मोदी यांना परदेशात प्रोजेक्ट करण्याचा आरएसएस ने खूप प्रयत्न केला. विश्व गुरु हा अंध भक्तांनी नवीन शब्द ही शोधला. मोदी मोदी मोदी मोदी नारे परदेशात ऐकू येत असत, या पाठीमागे आरएसएस होते. मोदी यांच्या विमानाच्या आगोदर काही दिवस ठराविक आरएसएस कार्यकर्ते यांचे प्रस्थान होत असे. अन् ते तिथे फक्त मोदी मोदी नारे लावत असत. कोरोना काळात त्यांना येण्यास बंदी केली, तेव्हा कुठ ही नारे ऐकू आले नाही.
राहुल गांधी यांची विश्व विक्रमी यात्रेची नोंद जगाने घेतली, पण विश्व गुरू म्हणून मोदींची नोंद जगाने कधीच घेतली नाही, घेतली ती केवळ अंध भक्त यांनीच. शिंदे फडणवीस यांनी मुंबईत जन आशिर्वाद यात्रा काढण्यास सुरवात केली. यात देशातील नऊ प्रमुख राजकीय नेत्यांनी मोदी यांना केंद्रीय तपास यंत्रणा गैरवापर बाबत खरमरीत पत्र लिहिले आहे. शरद पवार यांची सही असल्याने ह्या पत्राला वेटेज आले आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग गठण समिती स्थापन केली आहे. देशात नकळत भाजप विरोधात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडतं आहे. राज्यात शेतकरी प्रश्न कांद्यामुळे ऐरणीवर आला आहे. मंत्र्यांचे फिरणे अवघड झाले आहे. त्यांना शेतकरी रोषास सामोरे जावे लागत आहे. विखे ही यातून सुटले नाही. भाजप अन् शिंदे गटात एक भीती निर्माण झाली आहे. भाजपचा जनाधार कमी होत आहे. रामदास कदम यांच्या खेड मध्ये काल प्रथमच ठाकरे यांची सभा झाली. ही सभा उच्चांकी होती. त्यास समांतर अशी शिंदे अन् भाजप यांनी जन आशिर्वाद यात्रा काढली आहे. मुंबईत त्याचे प्रतीक दिसले. पण प्रतिसाद नगण्य होता. ऐन शिमग्यात राजकीय धुळवड चालू झाली आहे. जनता उद्धव ठाकरे यांना सहानभुतीच्या लाटेवर स्वार करीत आहे, तर शिंदे यांना तिरस्काराची वागणूक मिळत आहे.
शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजप चे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात येण्यास भाजप मंडळीत सुरवात झाली आहे. भाजप अंतर्गत मोठी धुसफूस सध्या चालू आहे. भाजप मधून लोक बाहेर पडून काही उद्धव ठाकरे तर काही अजित पवार यांना भेटत आहेत, हे लपून राहिले नाही. काल राष्ट्रवादीचे खेड मधील उमेदवार कदम शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी अन् शिवसेना यांचे साटेलोटे सुरू झाले आहे. तिन्ही ही पक्षांनी मेरिट चा उमेदवार निवडून आणण्यासाठी एक गुप्त प्लॅन तयार केला आहे. तो दोनशे जागा विधानसभा, अन् ४० जागा लोकसभा जिंकण्याचे टारगेट ठरवून आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी प्लॅन तयार करत आहे. काँग्रेस अजून सुस्त आहे, पण चाळीस एक मतदार संघ त्यांचे हमखास विजयाचे आहेत. भाजप मध्ये मोठी बंडाळी निवडणुकीत होईल. शिंदे यांना आपला गट भाजप मध्ये विलीन करावा लागेल. सत्ता संघर्ष निकाल होळी नंतर नक्की येईल. जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, पण न्यायलायावर नक्कीच आहे. शिंदे यांचे चाळीस साथीदार मोठ्या चिंतेत आहेत. उद्धव यांना शिमगा चांगला पावेल असे चित्र आहे. मुंबई महा पालिका ताब्यात घेण्यास भाजप उतावीळ आहे. पण त्यांना आहे ते नगरसेवक निवडून आणता येणार नाहीत असा त्यांचा अंतर्गत अहवाल आहे. म्हणूनच ते निवडणुका लांबणीवर टाकत आहेत. पण एक खरे की रोज सूर्य उगवत असतो, कोंबडे झाकले तरी…..
dmgaykar@gmail.com