भाषागौरव दिनी वणीत मनोज मोहिते यांचे व्याख्यान
वणी : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे वृत्तसंपादक मनोज मोहिते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मराठीचे मराठीपण या विषयावर होणाऱ्या या व्याख्यानप्रसंगी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. मानसकुमार गुप्ता हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य टिळक सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानास अभ्यासक नागरिक पालक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख डॉ. अजय देशपांडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजेन्द्र कोठारी, प्रा.उमेश व्यास, प्रा.मनोज जंत्रे,प्रा.किशन घोगरे , डॉ.विकास जुनगरी, प्रा.बाळा मालेकर,प्रा.प्रिया नगराळे,प्रा.राहुल खोंडे, प्रा.दीपाली ठावरी,पंकज सोनटक्के हे परिश्रम करीत आहे.