छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती काँग्रेस कार्यालयात साजरी
घुग्घूस : हिंदवी स्वराज्य तसेच मराठा साम्राज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
हा दिवस तमाम मराठी माणसासाठी सर्वात मोठा सण उत्सव आहे जो दरवर्षी उत्साहात साजरा केला जात आहे.
आज शहर काँग्रेस कार्यलयात सकाळी 11 वाजता शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून “जय भवानी जय शिवाजी’ च्या गजरात जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सुधाकर बांदूरकर, अलिम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर, अरविंद चहांदे, धनराज हनुवंते, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, सुनील पाटील, कपिल गोगला, रंजित राखुंडे, विजय रेड्डी, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.