राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनजागर यात्रेचे भद्रावती नगरीत आगमन!
@ किरण साळवी यांनी केले आशाताई मिरगे यांचे स्वागत!
@ सभेला सुरेखा देशमुख, शाहिन हकीम, वर्षा निकम, राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे व बेबीताई उईके यांची उपस्थिती!
भद्रावती (चंद्रपूर) : देशातील वाढती महागाई, अत्याचार, बेरोजगारी आदीं विषयांवर महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची “जनजागर-यात्रा” विदर्भात सुरू झालेली आहे. मोदी व शिंदे सरकारच्या विरोधात जनतेत जनजागरण करण्याच्या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितल्या जाते.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या जनजागर यात्रेने प्रवेश केला आहे.
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या भद्रावती नगरीत ही जनजागर यात्रा काल मंगळवारला (दि.१५फेब्रुवारीला) दुपारी पोहचली. शहरातील स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही यात्रा पोहचताच जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या वेळी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या महिला अध्यक्ष किरण साळवी यांनी आशाताई मिरगे यांचेसह अन्य महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
भद्रावतीच्या मुख्य मार्गावरील स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काल पार पडलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य निरीक्षक तथा प्रवक्त्या आशाताई मिरगे यांनी संबोधित केले. त्यांनी केन्द्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ही सरकार खोटी आश्वासने देणारी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले.
याच सभेत चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांचेही भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले. आयोजित सभेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वर्षाताई निकम (अमरावती), डॉ. सूरेखाताई देशमुख (वर्धा), नागपूर विभागीय अध्यक्ष शाहिन हकीम, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा पाटील, सरस्वती गावडे, पुजा शेरकी, नंदा शेरकी तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्यातील महिला व भद्रावती शहरातील नागरिक उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमात येथील माहिती अधिकार, पोलिस व पत्रकार सेना पदाधिकाऱ्यांनी आशाताई मिरगे यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या आशाताई मिरगे यांनी आयोजक किरण साळवी यांचे व त्यांचे टीमचे या वेळी तोंडभरून कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष किरण साळवी यांचेसह जिल्हा महिला उपाध्यक्ष मायाताई देशभ्रतार, जिल्हा महिला सचिव मंदाकिनी पाटील, विधानसभा उपाध्यक्ष कलावती कोडापे, विधानसभा सरचिटणीस अश्विनी हेलवटे, किरण राजूरकर, अनिता कुमरे, भारती शिडाम, सुधा कुरेकार, सुरेखा कुमरे, चंद्रप्रभा दुधे, नेहा टिपले छाया चिवंडे, कल्पना ठमके या शिवाय भद्रावती येथील माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार सेनाचे पदाधिकारी नागेन्द्र चटपल्लीवार, किर्ती पांडे, सुनिल रामटेके, सरफराज पठाण, जितेंद्र गुलानी, कल्पना गटुरवार, आदींनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमस्थळी “बहुत सुनी मन की बात, अब सुनो जन की बात” या आशयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रकाशित केलेले पत्रक उपस्थितीतांना वितरीत करण्यात आले. सदर पत्रकात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे काम व हुकुमशाहीची पोलखोल हे दोन मुद्दे नमुद करण्यात आले होते.