प्रविण गुरनुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्काराने सन्मानित
दि. 12 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला दुपारी एक वाजता पंचायत समिती सभागृह दर्यापूर जि.अमरावती येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका तथा कवयित्री सौ. वनिताताई गावंडे अकोला यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. खांडरे साखरे कला फाउंडेशनचे संचालक आदरणीय प्रशांतभाऊ दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रसारक असलेले ग्राम पंचायत गवारा, ता-झरी(जामनी) येथील उपसरपंच श्री. प्रविण नामदेव गुरनुले हे कला फौंडेशन पिंपळोद, संगीत महोत्सव व खुले कवी संमेलन ता.दर्यापुर जि. अमरावती द्वारा देण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार 2023 चे मानकरी ठरले आहेत. सदर पुरस्कार दि. 12 फेब्रुवारी 2023 ला पंचायत समिती सभागृह, दर्यापुर जि.अमरावती येथे कला फौंडेशन पिंपळोद सेवा संघाच्या कार्यकारीणी समोर वितरित करण्यात आला आहे. उपसरपंच श्री. प्रविण नामदेव गुरनुले हे समाजसेवक, उत्कृष्ट तबलावादक, गायक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रभावित आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न, बसफेरीची मागणी, ग्रामस्वच्छता मोहीम, रक्तदान शिबीर, रक्तदूत म्हणून सेवाकार्य तसेच रात्रीच्या वेळी आवसमिक व तात्काळ सेवा म्हणून आपल्या चारचाकी वाहनाचे लोकार्पण, गरजूंना मदत आदि, उपक्रमामुळे उपसरपंच श्री. प्रविण नामदेव गुरनुले हे बहुचर्चित आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तरुण युवक म्हणून युवकांसाठी आदर्श आहे. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सुयशाबद्दल, गुरुदेव सेवा मंडळ, परिवार, ग्रामपंचायत सदस्य, मित्रपरिवार समाजाच्या सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.