लग्नावर खर्च न करता शाळा डिजिटल केली….
युवा उद्योजक मनिष बुरडकर यांचा समाजापुढे नवा आदर्श…
वणी येथील युवा उद्योजक मनीष बुरडकर आपल्या महाविद्यालयीन आयुष्या पासून समाज हितासाठी काम करत होते. वणीत देखील त्यांनी या पूर्वी अनेक सेवा भावी उपक्रम राबविले. पुण्यातील डॉ. गणेश राख यांच्या मार्गर्शनाखाली विदर्भात पहिल्यांदा मनीष बुरडकर यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ जन आंदोलन आयोजित करून जनजागृती केली. आपल्या सेवाभावी वृतीमुळे मनीष ने आपले लग्न ही साधे पणाने करून दोन शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. हल्ली लग्न समारंभात पैश्यांची लयलूट बघायला मिळते. अशातच मनीष सारखे तरुण येत्या पिढीला नवीन दिशा देण्याचे काम करत आहे.
शिक्षणाने मला माझे हक्क, अधिकार समजावून दिले. आणि मला आजही वाटते की शिक्षण कागदा पुरते मर्यादित न ठेवता आपल्या कृतीतून सिद्ध केले पाहिजे. तर शिक्षण क्षेत्रात असलेल्या अपुऱ्या सोयी मुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये. देश डिजिटल होत ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे गेले पाहिजे म्हणून आज लग्न प्रसंगी आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे, असे मनिष बुरडकर ने मत व्यक्त केलं.
येथील महात्मा गांधी नगर परिषद शाळा क्रमांक १ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ७ ह्या दोन शाळेत शाळेतील एका वर्गात ४०” इंची अँड्रॉइड टीव्ही लावण्यात आला असून तो इंटरनेट ला जोडता येईल अशी सोय देखील आहे. यूट्यूब आणि किड्स टुब च्या माध्यमातून १ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षण आता मनोरंजक झाले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी नव दांपत्य संगीता आणि मनीष बुरडकर, सुयोग बुरडकर, पंकज बुरडकर, ओम झिल्पे , कांचन झिलपे, रितेश साखरकर, शुभम झीलपे, ऋतिक झिलपे, आदी उपस्थित होते.