भरधाव दुचाकीस्वार बाल बाल बचावला…! वाहतूक विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज

0
1253

राजुरा, २४ जानेवारी : सध्या शहरात भरधाव वेगाने वाहने चालविण्याची जणू पैज लागल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे. यातून अनेकदा अपघात होण्याच्याही घटना थोडक्यात टळताना दिसून येत आहेत. याकडे वाहतूक विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शहर वासियांकडून जोर धरू लागली आहे.

अशीच एक भयानक घटना आज सायं 4 वाजता घडली. प्रत्यक्षदर्शीनी ही थरारक घटना बघण्याऱ्या नागरिकांच्या ह्रदयाचा अक्षरशः क्षणभर ठोका चुकला. श्रीनिवास कॉलनी आसिफाबाद रोड राजुरा समोर भरधाव वेगाने दुचाकी येत होती. आणि दोन मुले सायकल ने रस्ता ओलांडत असताना त्यांना वाचविण्या करीता दुचाकी स्वाराने समोरील सायकलसह असणाऱ्या मुलांना वाचवण्या करीता बाजूने कट मारून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी भरधाव वेगात असल्यामुळे घासत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन नीलकंठेश्वर मंदिराच्या उभ्या फलकाला जोरदार धडक दिली. नशीब बलवत्तर होते आणि त्याने हेल्मेट व सेफ्टी वस्त्र परिधान केले असल्यामुळे त्या दुचाकीस्वाराचा व रस्ता ओलांडणाऱ्या वाटसरुंचा मोठा अपघात होता होता टळला.

एव्हाना या रस्त्यावर बरेच मजनू कर्कश आवाज व हिरोपंती करत वाहन हवेत चालवतात. आणि सर्व सामान्य जनतेला, पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होतो. पण वाहतूक पोलिस फक्त घटना घडायची वाट बघत असतात की काय अशी चर्चा जनमानसात या घटनेमुळे चर्चिली जात आहे. एक तर हा राज्य महामार्ग आहे आणि याच मार्गाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पान टपऱ्या, चायनीज कॉर्नर आणि वाढणारे छोट्या दुकानांचे अतिक्रमण आहे. हे सर्व या घटनेला मोठ्या प्रमाणत कारणीभूत असून पोलीस यंत्रणा कर्तव्यावर कुठेच दिसत नाही. आणि महत्वाचे म्हणजे या रोड रोमियोना साधी तंबी किंव्हा कागदपत्र तपासण्याची तसदी सुध्दा संबंधित विभागाकडून होताना दिसून येत नाही. यासोबत पालकांनी ही आपल्या पाल्याकडे वाहन चालविण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाढती रहदारी पाहता संबंधित वाहतूक यंत्रणेवर खूप मोठी जबाबदारी आहे. दिवसेंदिवस सुसाट वाहने पळविणे, हिरोपंती करणे, कर्कश हॉर्नचे आवाज, अवजड माल वाहतूक या घटनांत वाढ होत असल्याने यावर वेळीच आवर घालण्यासाठी संबंधित विभागाने कंबर कसावी अन्यथा मोठ्या अपघातास सामोरे जावे लागेल, त्यासाठी ठोस अशी कार्यवाही नवीन रूजू ठाणेदारांकडून व्हावी अशी आशा शहर वासीयांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here